- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं टी-२० विश्वचषकाची (T20 World Cup 2024) प्रसिद्धी आता सुरू केली आहे. आणि त्या अनुषंगाने स्पर्धेचं अधिकृत गीत प्रसिद्ध करण्यात आलं आहे. प्रसिद्ध ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) विजेता संगीतकार लॉर्नी बाल्फने (Lornie Balfe) हे गाणं बसवलं असून इथून पुढे आयसीसीच्या विश्वचषकाशी संबंधित सगळ्या कार्यक्रमात हे गीत वाजणार आहे. हे गाणं ही आयसीसीची स्वररुपी ओळख असेल असं आयसीसीने गाण्याविषयी म्हटलं आहे. (T20 World Cup 2024)
टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी अशा तीनही प्रकारच्या क्रिकेटचा जल्लोष या गाण्यात आहे. क्रिकेटमधील खिलाडूपणा आणि स्पर्धा हा या गीताचा आत्मा आहे. मिशन इम्पॉसिबल, ब्लॅक विडो आणि टॉप गन – मेव्हरिक हे बाल्फ यांचे काही गाजलेले हॉलिवू़ड सिनेमे आहेत. त्याच प्रकारचं संगीत त्यांनी क्रिकेट गीतालाही दिलं असल्याचं समजतंय. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- school syllabus: आता शालेय अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि बरंच काही…)
विशेष म्हणजे लंडनमधील एबी रोड रेकॉर्डिंग स्टुडिओत या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं आहे. यात क्रिकेटच्या मैदानातील खरे आवाज, क्रिकेटच्या साधनांचे स्टुडिओत घेतलेले आवाज तसंच बाल्फ यांच्या वाद्यवृंदातील काही वाद्य असा मेळ साधण्यात आला आहे. पण, हे गीत नेमकं कसं आहे हे आपल्याला १ जूनला स्पर्धेच्या उद्घाटनालाच कळणार आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तेव्हाच गाण्याचं अधिकृत अनावरण होईल. (T20 World Cup 2024)
Presenting the all-new ICC anthem, produced by Grammy-winning composer Lorne Balfe 🤩
➡ https://t.co/vEKSqYOQxe pic.twitter.com/XjObgoo8Im
— ICC (@ICC) May 23, 2024
बाल्फने गीताच्या निमित्ताने क्रिकेटशी जोडला जाण्याविषयी आनंद व्यक्त केला आहे. ‘आयसीसीबरोबर काम करताना मजा आली. खेळातील एकता जपणारं हे गाणं आहे. चेंडू सीमारेषेपलीकडे जाणं तसंच गोलदाजाने बळी मिळवणं या भावना गाण्यात आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. खेळाचा हाच आत्मा गाण्यात दिसावा असं आम्हाला वाटतं,’ असं बाल्फ या गाण्याविषयी बोलताना म्हणाला आहे. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: “…तर निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेन”, काँग्रेस मंत्र्याची उघड धमकी)
यंदा पहिल्यांदाच अमेरिकेत आयसीसीची एखादी स्पर्धा होत आहे. त्या निमित्ताने क्रिकेट हा खेळ अमेरिका खंडात पोहोचत आहे. आयसीसीला येत्या दिवसांमध्ये या खेळाची व्याप्ती वाढवायची आहे. त्यासाठी हा खेळ दृक-श्राव्य माध्यमातून जास्तीत जास्त लोकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. (T20 World Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community