T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकन संघांच्या जर्सीचं अनावरण

T20 World Cup 2024 : जर्सीबरोबरच किवी संघही जाहीर झाला आहे. 

222
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकन संघांच्या जर्सीचं अनावरण
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल स्पर्धा संपल्या संपल्या १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धा होणार आहे. आणि या स्पर्धेसाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघांनी आपल्या जर्सी लोकांसमोर आणल्या आहेत. किवी संघाच्या जर्सीचा रंग हा १९९० च्या दशकातील जर्सीशी मिळता जुळता आहे. (T20 World Cup 2024)

जर्सीचं अनावरण करताना ईश सोढी, जेम्स निशम, मार्क चॅपमन आणि टीम साऊदी या खेळाडूंचं फोटोसेशनही झालं. न्यूझीलंड संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नवीन जर्सी प्रसिद्ध करण्यात आली आहे. न्यूझीलंड संघाने यापूर्वी २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिली होती. संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवलं होतं. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर)

न्यूझीलंडचा संघ यंदाच्या स्पर्धेत सी गटात आहे. त्यांच्या बरोबर या गटात वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, पापुआ न्यू जिनी आणि युगांडा हे संघ आहेत. किवी संघाचा पहिला सामना ७ जूनला अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. न्यूझीलंड संघाबरोबरच दक्षिण आफ्रिकन संघाच्या जर्सीचंही अनावरण करण्यात आलं आहे. आफ्रिकन संघाच्या खांद्यावर राष्ट्रध्वज आहे. तर जर्सीवर दक्षिण आफ्रिकेचं राष्ट्रीय फूल कोरलेलं आहे. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Maharashtra Day 2024: वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात आंदोलन करून रस्ता रोखण्याचा प्रयत्न)

या आधीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आफ्रिकन संघ बाद फेरीत पोहोचू शकला नव्हता. आफ्रिकन संघाचा समावेश डी गटात आहे. आणि त्यांच्याबरोबर बांगलादेश, श्रीलंका, नेदरलँड्स आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. आफ्रिकन संघ ३ जूनला श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. (T20 World Cup 2024)

न्यूझीलंडचा टी-२० विश्वचषक संघ केन विल्यमसन (कर्णधार), फिन ॲलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डिवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, जिमी निशम, ग्लेन फिलीप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटर, ईश सोढी व टीम साऊदी (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.