- ऋजुता लुकतुके
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या मते भारताने टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) रिषभ पंत (Rishabh Pant) आणि यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) या डावखुऱ्या फलंदाजांचा योग्य वापर केला पाहिजे. म्हणूनच त्याचा सल्ला असा आहे की, रोहित (Rohit Sharma) बरोबर यशस्वीला सलामीला पाठवावं आणि संजू सॅमसन (Sanju Samson) ऐवजी यष्टीरक्षक फलंदाज म्हणूनही रिषभ पंतचीच (Rishabh Pant) निवड व्हावी. फलंदाजीत डावी – उजवी जोडी समोरच्या गोलंदाजाला त्रास देऊ शकते असं युवराजला वाटतं. आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत युवराजने टी-२० विश्वचषक आणि भारतीय संघावरील आपलं मत व्यक्त केलं आहे. (T20 World Cup 2024)
‘मला विचाराल, तर मी रोहित (Rohit Sharma) आणि यशस्वीला (Yashasvi Jaiswal) सलामीला पाठवेन. मग मधल्या फळीतही रिषभ पंतचा विचार करेन. विराट (virat kohli) तिसऱ्या क्रमांकावर असेल. तर सुर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) चौथा क्रमांक तसाही ठरलेला आहे. त्यामुळे फलंदाजीत समतोल येईल,’ असं युवराज (Yuvraj Singh) म्हणतो. संघात दोन उजव्या – डाव्या फलंदाजांच्या जोड्या असतील तर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना विचार करावा लागतो, असं स्पष्टीकरणही युवराजने दिलं आहे. (T20 World Cup 2024)
Adding to India’s left-handed batting stocks, Rishabh Pant has been tipped to win the race to take India’s gloves at the #T20WorldCup by Yuvraj Singh 🧤
More 👉 https://t.co/bINnj9rlX2 pic.twitter.com/iuDYFTxMIc
— ICC (@ICC) May 23, 2024
युवराज सिंग (Yuvraj Singh) हा टी-२० विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) ब्रँड अँबेसिडर आहे. त्यानिमित्ताने स्पर्धच्या काही कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी तो सध्या अमेरिकेत आला आहे. तिथेच आयसीसीने त्याची ही मुलाखत घेतली आहे. युवराज स्वत: २००७ च्या टी२० विजेत्या आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. २००७ मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. तर एकदिवसीय विश्वचषकातही तो सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- school syllabus: आता शालेय अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि बरंच काही…)
भारतीय संघाकडून आता युवराजला (Yuvraj Singh) पुन्हा आयसीसी विजेतेपदाच्या आशा आहेत. आणि त्यासाठी यष्टीरक्षक फलंदाजाची निवड करतानाही त्याची पसंती रिषभ पंतला आहे. ‘दोघांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण, रिषभला आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त अनुभव आहे. आणि पुन्हा तो डावखुरा आहे. त्याचा फायदा भारतीय संघाला मिळू शकेल,’ असं युवराज म्हणतो. (T20 World Cup 2024)
१ ते २९ जून दरम्यान टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये रंगणार आहे. आणि भारतीय संघ ५ जूनला आयर्लंड विरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. (T20 World Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community