T20 World Cup 2024 : फ्लोरिडातील वादळाचा फटका पाकिस्तानलाही? स्पर्धेतून बाद होण्याची भीती

T20 World Cup 2024 : फ्लोरिडात वादळामुळे पुढील सामने धोक्यात आले आहेत 

187
T20 World Cup 2024 : फ्लोरिडातील वादळाचा फटका पाकिस्तानलाही? स्पर्धेतून बाद होण्याची भीती
T20 World Cup 2024 : फ्लोरिडातील वादळाचा फटका पाकिस्तानलाही? स्पर्धेतून बाद होण्याची भीती
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup 2024) न्यूयॉर्कचा टप्पा आता संपला आहे. उर्वरित आठवड्यात अमेरिकेत असलेल्या संघांचा मुक्काम फ्लोरिडाला हलणार आहे. पण, तिथे सध्या वादळाची चिन्हं आहेत. त्याचा फटका तिथे होणाऱ्या तीनही सामन्यांना बसू शकतो. निम्म्याच्या वर फ्लोरिडा राज्य वादळी पावसाचा तडाखा सहन करत आहे. त्यामुळे तीन सलग सामने पावसात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसं झालं तर ए गटातील निकालांवर परिणाम होऊन सुपर ८ चं चित्रही बदलू शकतं. या गटातून आतापर्यंत भारताने सुपर ८ मध्ये निश्चितपणे प्रवेश केला आहे. दुसऱ्या संघासाठी अमेरिका (America) आणि पाकिस्तान (Pakistan) संघांमध्ये चुरस असेल. पण, अमेरिकेने ३ पैकी २ सामने जिंकून ४ गुणांची कमाई केली आहे. तर पाकिस्तानने (Pakistan) ३ सामन्यांत २ गुण मिळवले आहेत. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Cancer Treatment : कर्करोगावरचे उपचार आता खिशाला परवडणार… रेडिओथेरपीचे साईडइफेक्टसही होणार कमी)

त्यामुळे उर्वरित सामने वाहून गेले तर ५ गुणांसह अमेरिका (America) सुपर ८ मध्ये प्रवेश करेल. पाकिस्तानला सुपर ८ प्रवेशासाठी आयर्लंडविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावाच लागणार आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचा शेवटच्या साखळी सामन्यात पराभव व्हावा अशी आशाही बाळगावी लागणार आहे. पण, तसं झालं नाही तर पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात येईल. पावसामुळेही ते संपुष्टात येईल.  (T20 World Cup 2024)

ए गटातील सद्यस्थिती 

भारत – ३ सामन्यांत ६ गुण (१.१३७) – सुपर ८ प्रवेश निश्चित 

अमेरिका – ३ सामन्यांत ४ गुण (०.१२७)

पाकिस्तान – ३ सामन्यांत २ गुण (०.१९१)

कॅनडा – ३ सामन्यांत २ गुण (-०.४९३)

आयर्लंड – २ सामन्यांत ० गुण (-१.७१२)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Canada : भारताच्या कॅनडा विरुद्धच्या सामन्यावर वादळाचं सावट)

मियामी इथं ए गटातील ३ सामने व्हायचे आहेत. १४ जूनला अमेरिका (America) वि, आयर्लंड (Ireland). हा सामना वाहून गेला तरी या गटातील चित्र स्पष्ट होईल. १५ जूनला भारत विरुद्ध कॅनडा (Canada) सामना होणार आहे. आणि १६ जूनला पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना होणार आहे. शुक्रवारचा सामना झाला आणि अमेरिकेनं तो जिंकला तर तरी अमेरिका सुपर ८ मध्ये जाईल. ते हरले तर पाकिस्तानला थोडीफार संधी असेल. त्यांना आयर्लंड विरुद्ध जिंकावंच लागेल. (T20 World Cup 2024)

लाऊडरडेल आणि हॉलिवूड या दोन शहरांच्या महापौरांनी बुधवारीच नैसर्गिक आणीबाणी जाहीर केली आहे. हवामान खात्याने अजून चक्रीवादळाची शक्यता वर्तवली नसली तरी पुढचे ४ दिवस वादळी पावसाचे असतील असंच म्हटलं आहे. अशा परिस्थितीत सामने होणं तसं कठीणच आहे. (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.