T20 World Cup 2024 : रोहित, आगरकर यांना हार्दिक संघात नको होता?

T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषक संघात रोहित शर्मा कप्तान तर हार्दिक पांड्या उपकप्तान असेल

192
T20 World Cup 2024 : रोहित, आगरकर यांना हार्दिक संघात नको होता?
T20 World Cup 2024 : रोहित, आगरकर यांना हार्दिक संघात नको होता?
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ स्पर्धेतून बाद होणारा पहिला संघ ठरला. याची सुरुवात काहीशी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच झाली होती. हंगाम सुरू व्हायला काही दिवस शिल्लक असताना संघ प्रशासनाने रोहित शर्मा (Rohit Sharma) ऐवजी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवलं. ही गोष्ट ना चाहत्यांना रुचली ना संघातील खेळाडूंना. १० वर्षं रोहितने संघाचं नेतृत्व केलं होतं. अचानक झालेल्या या बदलामुळे खेळाडूही गोंधळलेले दिसले. संघ एकजीव होऊन खेळताना दिसला नाही. त्याचा परिणाम कामगिरीवर दिसला. काही दिवसांपूर्वी टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) भारतीय संघ जाहीर झाला आहे. यातील चार महत्त्वाचे खेळाडू हे मुंबई इंडियन्समधील आहेत. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Ghatkopar Hoarding Accident : करोना काळात ठाकरे सरकारने दिला होता मुंबई होर्डिंग ओनर्स असोसिएशनला हात)

रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा कर्णधार आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) उपकर्णधार. याशिवाय जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) आणि सुर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) संघात आहेत. अशावेळी विश्वचषकापूर्वी मुंबई इंडियन्स संघात दिसलेला बेबनाव भारतीय संघाच्याही मूळावर उठू शकतो. दैनिक जागरण सारख्या मोठ्या समुहाने दिलेल्या बातमीनुसार, निवड समितीच्या बैठकीत कर्णधार रोहित शर्मा तसंच निवड समितीचे काही सदस्यही हार्दिक पांड्याचा संघात समावेश करण्याच्या विरोधात होते. अगदी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांचंही तेच मत होतं. (T20 World Cup 2024)

खुद्द हार्दिक पांडयाची (Hardik Pandya) मैदानातील कामगिरीही सरस नाही. १३ सामन्यांत त्याने जेमतेम २०० धावा केल्या आहेत. आणि षटकामागे ११ धावा देत ११ बळी मिळवले आहेत. स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली तेव्हा त्याची कामगिरी थोडीफार सुधारली. अन्यथा सुरुवातीला तो गोंधळलेल्या अवस्थेत होता.  (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- National Parks : भारतातील ‘ही’ राष्ट्रीय उद्याने पावसाळ्यात राहतील बंद)

आता सुरू असलेल्या चर्चेनुसार, हार्दिकच्या संघात समावेशासाठी काहींचा दबाव होता. अर्थात, तो मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीकडून होता की, बीसीसीआयमधील व्यक्तींकडून होता, हे समजायला वाव नाही. पण, तशी उघड चर्चा सुरू झाली आहे. टी-२० विश्वचषकानंतर (T20 World Cup 2024) रोहित शर्मा टी-२० प्रकारातून निवृत्ती घेणार असल्याचंही दैनिक जागरण मधील बातमीत म्हटलं आहे. (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.