- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup) भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होता आणि भारतीय संघाने (Indian team) तो ८ गडी राखून जिंकला. एरवी सामना गोलंदाजांनी गाजवला असला तरी अनियमित उसळी असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं हे आव्हान होतं आणि भारतीय कर्णधार रोहित शर्माने सलामीला येत ते व्यवस्थित पेललं. ३७ चेंडूंत ५२ धावा करताना त्याने ३ षटकार आणि ४ चौकार लगावले. फलंदाजीत त्याने ४,००० आंतरराष्ट्रीय टी-२० धावांचा टप्पा पार केला. पण, त्याचबरोबर कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचा एक विक्रमही त्याने मागे टाकला. (T20 World Cup 2024)
कर्णधार म्हणून रोहितने ५५ टी-२० सामन्यांपैकी ४३ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर धोनीच्या ४१ विजयांना त्याने मागे टाकलं. धोनीने मिळवलेले ४२ विजय हे ७७ सामन्यांतील होते. (T20 World Cup 2024)
Topping The Charts – the Rohit Sharma way! 🔝
Most Wins as the #TeamIndia captain in Men’s T20Is 👏 👏#T2OWorldCup | #INDvIRE | @ImRo45 pic.twitter.com/V9SyUS0g7t
— BCCI (@BCCI) June 5, 2024
(हेही वाचा – Powai Bheemnagar : पवईमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान दगडफेक! ५ पोलिस जखमी)
संघातील खेळाडूंना बरोबर घेऊन चालण्याचा रोहितचा स्वभाव त्याला चांगला कर्णधार बनवतो. त्याचबरोबर क्रिकेटची जाण, परिस्थितीनुरुप घेतलेले निर्णय याचाही वाटा विजयाच्या टक्केवारीत आहे. खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यात त्याचा हातखंडा आहे. खेळाडूंनी मोकळेपणाने व्यक्त व्हावं असं वातावरण ड्रेसिंग रुममध्ये तयार करण्याचं श्रेय रोहितला दिलं जातं. खेळाडूंचं कौशल्य ओळखून त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकण्याचा रोहितचा स्वभाव आहे आणि त्यामुळे भारतीय संघ सध्या एकदिलाने खेळताना दिसत आहे. (T20 World Cup 2024)
कर्णधारपदी बढती झाल्यानंतर रोहितची फलंदाजीही बहरली आहे. आव्हान स्वीकारणं हा रोहितचा स्वभाव आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारात आक्रमक आणि गोलंदाजीला धुवून काढणारा फलंदाज अशी त्याची ओळख आहे. कर्णधार झाल्यानंतर त्यात सातत्य आलं आहे. (T20 World Cup 2024)
टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांची यादी पाहूया,
- ८१ सामन्यांत ४६ विजय – बाबर आझम (पाकिस्तान)
- ५७ सामन्यांत ४४ विजय – ब्रायन मसाबा (युगांडा)
- ७१ सामन्यांत ४४ विजय – इयॉन मॉर्गन (इंग्लंड)
- ५५ सामन्यांत ४३ विजय – रोहित शर्मा (भारत)
- ५२ सामन्यांत ४२ विजय – असगर अफगाण (अफगाणिस्तान)
- ७२ सामन्यांत ४२ विजय – महेंद्रसिंग धोनी (भारत)
- ७६ सामन्यांत ४१ विजय – एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) (T20 World Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community