T20 World Cup 2024 : रोहित शर्मालाच संघात हवे होते ४ फिरकीपटू ?

T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात भारताने ५ फिरकीपटूंची निवड केली आहे

232
T20 World Cup Ind vs Pak : रोहितला सरावादरम्यान पुन्हा दुखापत
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने टी-२० विश्वचषकासाठीच्या (T20 World Cup 2024) संघात शिवम दुबे (Shivam Dubey) हा अष्टपैलू फिरकीपटू धरून एकूण ५ फिरकी गोलंदाजांची निवड केली आङे. कुलदीप यादव (Kuldeep Yadav), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि अक्षर पटेल (Axar Patel) हे तिघे पूर्णपणे फिरकीची धुरा वाहू शकतील. तर रवींद्र जडेजाही (Ravindra Jadeja) अष्टपैलू फिरकीपटूच आहे. उलट तेज गोलंदाजीत फक्त जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि युवा अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांचा संघात समावेश आहे. ही संघाची ठरवून आखलेली रणनीती आहे असं कर्णधार रोहित (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झालं आहे. (T20 World Cup 2024)

वेस्ट इंडिजमधील धिमी खेळपट्टी आणि भारतीय सामन्यांची सकाळी दहा वाजताची वेळ यामुळे संघ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कर्णधार रोहित शर्माच किमान ४ फिरकीपटूंसाठी आग्रही होता. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून लढणार )

‘मला रणनीतीविषयी खूप काही सांगायचं नाही. कारण, मी जे बोलतोय ते प्रतिस्पर्धी कर्णधारांपर्यंत पोहोचणार आहे. पण, एकच सांगतो, मलाच ४ फिरकीपटू हवे होते. मी वेस्ट इंडिजमध्ये बऱ्यापैकी क्रिकेट खेळलो आहे. तिथे चेंडू नीट बॅटवर येत नाही. फिरकीपटूंसाठी हे चांगलं आहे. शिवाय भारताचे सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहाला सुरू होणार आहेत. ही वेळ बघता आम्हाला फिरकीपटू संघात घेणं योग्य वाटलं,’ असं रोहीतने स्पष्ट केलं. (T20 World Cup 2024)

रोहितचा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) या अष्टपैलू फिरकीपटूंवरही भरवसा होता. कारण, भारतीय संघाला मधल्या फळीत फटकेबाजी करणारे फलंदाज हवे आहेत. तो विचार करून दोघांचा समावेश झालेला दिसतोय. शिवम दुबेलाही मधल्या फळीतील फटकेबाज फलंदाज म्हणून संघ प्रशासन पाहत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दुबे फॉर्मात आहे. १० सामन्यांत त्याने ३५० धावा केल्या आहेत त्या १७० च्या स्ट्राईक रेटने. (T20 World Cup 2024)

आयपीएलमधील कामगिरीचा किती प्रभाव संघ निवडीवर झाला या प्रश्नालाही रोहितने मोकळेपणाने उत्तर दिलं. ‘७० ते ८० टक्के संघ हा आयपीएल सुरू होण्यापूर्वीच माझ्या मनात होता. आयपीएलमधील कामगिरीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं इतकंच,’ असं रोहित म्हणतो. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Amitabh Bachchan : बिग बींच्या ट्विटमुळे भाजपा आणि आदित्य ठाकरे आमने-सामने!)

२ जूनपासून टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरू होत आहे. भारताचा पहिला सामना ३ जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे. (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.