T20 World Cup 2024 : आयसीसीकडून सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, भारताचा एकमेव सराव सामना

T20 World Cup 2024 : भारतीय संघ विश्वचषक सुरू होण्यापूर्वी एकमेव सराव सामना खेळणार आहे.

178
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकावर माजी खेळाडूंची टीका
  • ऋजुता लुकतुके

वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडून टी २० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टी-२० वर्ल्ड कपची सुरुवात १ जूनपासून होणार आहे. आयसीसीकडून टी २० वर्ल्डकप पूर्वीच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. सराव सामने २७ मे ते १ जून दरम्यान होणार आहेत. (T20 World Cup 2024)

आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबगोमध्ये या सराव सामन्यांचं आयोजन केलं जाईल. या ठिकाणी एकूण १६ सराव सामने होणार आहेत. टेक्सास, फ्लोरिडा, क्वीन्स पार्क ओव्हल आणि ब्रायन लारा क्रिकेट अकादमी त्रिनिदाद आणि टोबॅगोतील मैदानावर हे सामने पार पडतील. (T20 World Cup 2024)

टी २० वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या २० संघांपैकी केवळ १७ संघ सराव सामने खेळतील. काही संघ एक सराव सामना तर काही संघ दोन सराव सामने खेळतील. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Drop Box मधून चेक चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेकडून अटक)

सराव सामन्यांचं वेळापत्रक
२७ मे

कॅनडा विरुद्ध नेपाळ : टेक्सास
ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी : त्रिनिदाद आणि टोबॅगो 
नामिबिया विरुद्ध युगांडा : त्रिनिदाद आणि टोबॅगो

२८ मे

श्रीलंका विरुद्ध नेदरलँडस : फ्लोरिडा
बांगलादेश विरुद्ध अमेरिका : टेक्सास
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया : त्रिनिदाद आणि टोबॅगो

२९ मे

दक्षिण आफ्रिका इ्ट्रा स्क्वाड मॅच : फ्लोरिडा
अफगाणिस्तान विरुद्ध ओमान : त्रिनिदाद आणि टोबॅगो

३० मे

नेपाळ विरुद्ध अमेरिका : फ्लोरिडा
स्कॉटलँड विरुद्ध युगांडा : त्रिनिदाद आणि टोबॅगो
नेदरलँडस विरुद्ध कॅनडा : त्रिनिदाद आणि टोबॅगो
नामिबिया विरुद्ध न्यू पापुआ गिनी : टेक्सास
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया : त्रिनिदाद आणि टोबॅगो

३१ मे

आयरलँड विरुद्ध श्रीलंका : फ्लोरिडा
स्कॉटलँड विरुद्ध अफगाणिस्तान : त्रिनिदाद आणि टोबॅगो

१ जून

बांगलादेश विरुद्ध भारत : टीबीसी अमेरिका

(हेही वाचा – PM Narendra Modi यांना हरवण्यासाठी मुस्लिम वाढवत आहेत उबाठा शिवसेनेची ताकद, परिधान केल्या भगव्या टोप्या)

आयसीसीनं (ICC) सराव सामन्यांबाबत आणखी माहिती दिली आहे. या सराव सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा नसेल. हे सामने २० षटकांचे असतील. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी चाहत्यांना तिकिट खरेदी करावी लागणर आहेत. (T20 World Cup 2024)

दरम्यान, भारतीय संघ केवळ एकच सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघ दोन टप्प्यात टी २० वर्ल्डकपसाठी रवाना होणार आहे. भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असल्यानं जे खेळाडू लवकर आयपीएलमधून फ्री होतील ते टी २० वर्ल्डकपला पहिल्या टप्प्यात रवाना होणार आहेत. (T20 World Cup 2024)

भारतीय संघाचं नेतृत्त्व रोहित शर्मा करत असून २००७ नंतर पुन्हा एकदा टी २० वर्ल्डकप जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. भारतीय संघ विजेतेपद मिळवण्यात यशस्वी होणार का ते पाहावं लागेल. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.