- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्घेत सोमवारी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेली डी गटातील लढत अनेक अर्थांनी महत्त्वाची होती. एकतर भारतीय संघ (Indian Team) खेळणार असलेल्या रसॉ काऊंटीच्या मैदानात हा सामना होत होता आणि साधारण तुल्यबळ प्रतिस्पर्धी आमने सामने होते. अशावेळी न्यूयॉर्कच्या खेळपट्टीने आपले रंग या सामन्यात दाखवले. पहिली फलंदाजी करणारा लंकन संघ अक्षरश: ७७ धावांत सर्वबाद झाला आणि आफ्रिकन संघालाही ८० धावा करण्यासाठी १६ षटकं वाट पहावी लागली आणि ४ फलंदाज गमवावे लागले. (T20 World Cup 2024)
भारतीय संघ आपले चारही साखळी सामने याच मैदानावर खेळणार आहे आणि मैदानावर एकूण ४ खेळपट्ट्या असल्या तरी खेळपट्टीचे रंग ओळखण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा होता. अगदी सुरुवातीपासूनच लंकन फलंदाजांचं गणित बिघडत गेलं. कासिगो रबाडाने चौथ्या षटकापासून लंकेला धक्के द्यायला सुरुवात केली. पण, सगळ्यात प्रभावी ठरला तो एनरिच नॉरये. त्याने ४ षटकांत फक्त ९ धावा देत ४ बळी मिळवले. आणि बार्टमाननेही ४ षटकांत फक्त ९ धावा दिल्या. थोडक्यात, तेज गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगलं यश मिळालं. केशव महाराजने ४ षटकांत २२ धावा देत २ बळी मिळवले. (T20 World Cup 2024)
South Africa win in New York 🔥
A terrific bowling display against Sri Lanka earns them two valuable points in the #T20WorldCup 2024 👏#SLvSA | 📝: https://t.co/Css94hTFGF pic.twitter.com/WFRTEcykeP
— ICC (@ICC) June 3, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election Live Update: राज्यातील १० दिग्गजांना धक्के, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर जाणून घ्या)
विजयासाठी ७८ धावांचं माफक आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकन फलंदाजांनाही सुरुवातीला खेळपट्टीने धक्के दिलेच. दुसऱ्याच षटकांत हेन्द्रिक्स ४ धावा करून बाद झाला. मागोमाग मार्करमही १२ धावा करून माघारी परतला. ट्रिस्टियस स्टब्ज १३ तर सलामीवीर क्विंटन डी कॉक २० धावा करून तंबूत परतले. त्यानंतर मात्र क्लासेन आणि डेव्हिड मिरर यांनी अधिक पडझड होऊ दिली नाही. (T20 World Cup 2024)
दोघांनी २२ धावांची भागिदारी करत आफ्रिकन संघाला विजय मिळवून दिला. डी गटात आता आफ्रिकन संघाने २ गुणांसह आघाडी घेतली आहे. याच मैदानावर भारतीय संघ ५ जूनला आयर्लंडशी दोन हात करणार आहे. (T20 World Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community