- ऋजुता लुकतुके
‘डावखुरा फलंदाज रिंकू सिंगने (Rinku Singh) काहीही चुकीचं केलेलं नाही. उलट त्याला वगळण्याचा निर्णयच सगळ्यात कठीण होता,’ अशा भावना निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी व्यक्त केल्या आहेत. अखेर संघातील अंतिम अकरा खेळाडूंची सरमिसळ कशी असेल याचा विचार झाला आणि तिथे शिवम दुबेचं पारडं रिंकू सिंग पेक्षा वरचढ ठरलं, असा सूर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या पत्रकार परिषदेत दिसून आला. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याआधीचं Eknath Khadse प्रचाराला मैदानात!)
रिंकू सिंगला वगळल्यामुळे सोशल मीडिया आणि माजी खेळाडूंमध्येही जोरदार चर्चा रंगली आहे. मागच्या वर्षभरात रिंकूने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावरील घणाघाती फलंदाजी करू शकणार फलंदाज म्हणून नाव कमावलं आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय (T20 World Cup 2024) सामन्यांत त्याने ३५६ धावा जमवल्या आहेत त्या ८९ च्या सरासरीने आणि १७५ धावांच्या तगड्या स्ट्राईक रेटने. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत धावांचा पाठलाग करतानाची त्याची सफाईही दिसून आली होती. (T20 World Cup 2024)
‘रिंकू सिंगचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे निवडीच्या तो किती जवळ होता, हे तुम्हाला समजू शकेल. पण, पंधरा जणांचाच संघ ठरवता येतो. त्यामुळे रिंकू एकटाच नाही तर शुभमन गिललाही बाहेर बसावं लागलं आहे. कर्णधार म्हणून रोहीतला चेंडू भरपूर वळवू शिकतील असे फिरकीपटू हवे होते. तिथे एक गोलंदाज जास्त झाला. तो अष्टपैलू असेल असं आम्ही बघितलं. कमी झालेल्या एका फलंदाजाची जागा रिंकू सिंगने गमावली,’ असं अजित आगरकर यांनी प्रांजळपणे सांगितलं. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- T20 World Cup 2024 : रोहित शर्मालाच संघात हवे होते ४ फिरकीपटू ?)
गेल्या हंगामात रिंकूने कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) भन्नाट कामगिरी केली होती. त्या जोरावर तो भारतीय संघातही आला. पण, यंदाच्या हंगामात त्याला पुरेशी फलंदाजीची संधी मिळालेलीच नाही. त्यामुळे १० सामन्यांत त्याच्या फक्त १२३ धावा झाल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट मात्र १५० धावांचा आहे. (T20 World Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community