T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघ करतोय एका पार्कमध्ये सराव

सुरक्षेच्या कारणास्तव आयोजकांनी भारतीय संघासाठी सरावाची सोय वेगळ्या ठिकाणी केली आहे.

164
T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघ करतोय एका पार्कमध्ये सराव
T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघ करतोय एका पार्कमध्ये सराव
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारतीय संघ मंगळवारी आपला पहिला सामना खेळणार आहे. आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी संघाबरोबरचा हा शेवटचा दौरा असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यांनाही भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी बघायची आहे. एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीत भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. आता मात्र एक पाऊल पुढे टाकण्याची द्रविड आणि संघाची मनिषा आहे. त्याचवेळी एक गोष्ट त्यांना खटकतेय. भारतीय संघासाठी न्यूयॉर्कमध्ये सरावाची सोय आहे ती कँटिग पार्कमध्ये. तर सामना नसॉ काऊंटीच्या मैदानात होणार आहे.

कँटिग पार्क हे एक सार्वजनिक पार्क आहे. आणि क्रिकेट मैदान सोडून अशा ठिकाणी सराव करावा लागत असल्यामुळे द्रविडला काळजी वाटतेय. या विश्वचषकातील २० सामने अमेरिकेत आहेत. आणि त्यातील ८ नसॉ काऊंटी मैदानावर आहेत.

(हेही वाचा – Uttarakhand: खराब हवामानामुळे ट्रेकिंगसाठी गेलेले २२ जण बेपत्ता, तर ४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता)

‘एखाद्या सार्वजनिक पार्कमध्ये सराव करणं हे थोडं विचित्रच आहे. विश्वचषकासारखी स्पर्धा असताना तुम्ही क्रिकेटच्या मैदानात सराव करणं अपेक्षित आहे. आणि इथं तर पार्कमध्ये आमची सोय करण्यात आलीय,’ असं द्रविडने पत्रकारांना बोलून दाखवलं. हे बोलताना द्रविडच्या चेहऱ्यावर छद्मी हास्यही होतं. (T20 World Cup 2024)

नसॉ काऊंटी मैदानातील तयार खेळपट्टीविषयीही सध्या बरीच चर्चा सुरू आहे. भारतीय संघ आपले तीन सामने याच मैदानावर खेळणार आहे.

(हेही वाचा – Mumbai Rain: मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा; ‘या’ भागांत मुसळधार पावसाच्या सरी)

सोमवारी या मैदानावर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान लढत रंगली होती. लंकन संघ पहिली फलंदाजी करताना ७७ धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे खेळपट्टीवर चर्चा आणखी वाढली आहे. द्रविडला खेळपट्टीची काळजी तर वाटतेच. शिवाय विश्वचषकासारखी स्पर्धा असताना शहरात त्याविषयी उत्सुकता नसल्याचं त्याला जास्त आश्चर्य वाटतंय. ‘अमेरिकेसारख्या नवीन देशात क्रिकेट हा खेळ पोहोचतोय हे चांगलंच आहे. पण, त्याचवेळी इथं क्रिकेट लोकप्रिय नाही, हे जाणवतंय. आणि त्यामुळे स्टेडिअममध्ये खेळताना तितकीशी मजा येत नाही. पण, हे चित्रही बदलेल,’ असं द्रविड म्हणाला.

अर्थात, या सगळ्या क्रिकेट व्यतिरिक्तच्या गोष्टी आहेत. महत्त्वाचं आहे ते क्रिकेट ही गोष्टही द्रविडला चांगलीच ठाऊक आहे. आणि त्यामुळे भारतीय संघ आता इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत करत आहे, हे सांगायला शेवटी राहुल द्रविड (Rahul Dravid) विसरले नाहीत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.