- ऋजुता लुकतुके
युगांडा देशाला आयसीसीचा कसोटी दर्जा नाही. त्यामुळे सर्वोच्च स्तरावर संघाला कधी खेळायला मिळालेलं नाही. पण, संघातील फिरकीपटू फ्रँक एनसुबुगा असोसिएशन देशांच्या स्तरावर किफायतशीर गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने कारकीर्दीत १५ षटकं निर्धाव टाकली आहेत. आणि टी-२० क्रिकेटमध्ये (T20 World Cup 2024 ) हा विक्रम आहे. पापुआ न्यू जिनी (Papua New Guinea) विरुद्ध आता त्याने गोलंदाजीचा आणखी एक विक्रम केला आहे. सर्वात किफायतशीर गोलंदाजी त्याच्या नावावर लागली आहे. त्याने निर्धारित ४ षटकांत २ षटकं निर्धाव टाकली. आणि ४ धावा देत त्याने २ बळी घेतले आहेत. (T20 World Cup 2024 )
(हेही वाचा- ठाण्यातील धावपटूंची धाव साऊथ आफ्रिकेपर्यंत; 90 किलोमीटर Ultra Marathon मध्ये घेणार सहभाग)
या विश्वचषकात कर्णधार नाणेफेक जिंकल्यावर पहिली गोलंदाजी घेत आहेत. तसंच युगांडाने पापुआ न्यू जिनीविरुद्ध (Papua New Guinea) केलं. आणि त्यानंतर एनसुबुगाने (Nsubuga) आपली कमाल दाखवली. पापुआ न्यू जिनीला (Papua New Guinea) युगांडाने १९.१ षटकांत ७७ धावांत सर्वबाद केलं. यात एनसुबुगाने चार्ल्स अमिनीचा ५ धावांवर त्रिफळा उडवला. तर हिरी हिरीला त्याने १५ धावांवर पायचीत पकडलं. (T20 World Cup 2024 )
What a memorable night for 43-year-old Frank Nsubuga, who bowled his 4 overs and conceded only 4 runs!
BARESI doing what he does best🔥#T20WorldCup #WeAreCricketCranes pic.twitter.com/0OxdMY26yr
— Uganda Cricket Association (@CricketUganda) June 6, 2024
या कामगिरीनंतर एनसुबुगाने आनंद व्यक्त केला आहे. ‘हा माझा पहिला टी-२० विश्वचषक आहे. आणि त्यात अशी कामगिरी करणं हे माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे. खेळपट्टी धिमी होती. त्यामुळे मी ही गती कमी केली. तसंच अचूक मारा करण्यावर भर दिला. संघातील तरुण खेळाडूंच्या बरोबर राहण्याचा मी प्रयत्न करतोय,’ असं ४१ वर्षीय एनसुबुगा म्हणाला. (T20 World Cup 2024 )
Remember the name.
Frank Nsubuga!@CricketUganda
#T20WorldCup pic.twitter.com/9TDgFEGQyG
— Beewol (@beewol) June 6, 2024
युगांडाचा समावेश स्पर्धेच्या ए गटात झाला आहे. आणि त्यांचा हा पहिलाच टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024 ) आहे. याआधीच्या सामन्यात अफगाणिस्तानने त्यांचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे त्यांच्या सुपर एट गाठण्याची शक्यता धुसर आहे. याच गटात यजमान वेस्ट इंडिज संघाचाही समावेश आहे. (T20 World Cup 2024 )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community