- ऋजुता लुकतुके
आगामी पुरुषांच्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर (Brand Ambassador) म्हणून ऑलिम्पिक स्टार जमैकाचा धावपटू युसेन बोल्टच्या नावाची घोषणा झाली आहे. आयसीसीने (ICC) बुधवारी हा सुखद धक्का दिला. टी-२० विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) येत्या १ ते २९ जून रोजी वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकेत होणार आहे. बोल्टच्या समावेशामुळे क्रिकेटला ॲथलेटिक्सचं ग्लॅमर मिळणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही आठवडे आधी आयसीसीने बोल्टची नियुक्ती जाहीर केली आहे. (T20 World Cup 2024)
या निर्णयामुळे क्रिकेटचा जगभर प्रसार होण्यात मदतच होणार आहे. बोल्ट हा जगातील एक यशस्वी धावपटू आहे. त्याची ख्याती जगभरात सगळीकडे आहे. या लोकप्रियतेचा क्रिकेटच्या प्रसाराला फायदा होणार आहे. (T20 World Cup 2024)
Gear up for some speed, thrill and excitement on and off the pitch ⚡
Usain Bolt joins as an ambassador for the ICC Men’s #T20WorldCup 2024 🤩https://t.co/MOlH8H8kkX
— ICC (@ICC) April 24, 2024
शिवाय कित्येक वर्षांनंतर आयसीसीची एखादी स्पर्धा ही वेस्ट इंडिजमध्ये होतेय. अशावेळी कॅरेबियन बेटांपैकीच असलेल्या जमैकाचा धावपटू ब्रँड अँबेसिडर (Brand Ambassador) असल्यामुळे देशातही या स्पर्धेला चांगली प्रसिद्धी मिळणार आहे. ऑलिम्पिकमध्ये बोल्टची महती अवर्णनीय आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये (Rio Olympics) बोल्टने १०० मी, २०० मी आणि ४०० मी रिले स्पर्धेत सुवर्ण जिंकली. विशेष म्हणजे सलग तीन ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट – ट्रीक करण्याची किमया त्याने सलग तिसऱ्यांदा केली. एकूण ९ ऑलिम्पिक सुवर्ण त्याच्या नावावर जमा आहेत. (T20 World Cup 2024)
इतकंच नाही तर २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टने १०० मी, २०० मी आणि ४०० मीटर रिले स्पर्धा या नवीन जागतिक विक्रमांसह जिंकल्या होत्या. ब्रँड अँबेसिडर (Brand Ambassador) होण्याचा भाग म्हणून बोल्ट स्पर्धेशी संबंधित काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. पुढील आठवड्यात स्पर्धेचं गीत प्रसिद्ध होणार आहे. त्या सोहळ्यालाही बोल्टची उपस्थिती असेल. (T20 World Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community