- ऋजुता लुकतुके
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजय जाडेजाने टी-२० विश्वचषकासाठीच्या संघ उभारणीत एक छोटासा बदल सुचवला आहे. ‘रोहितने स्वत:ला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावं आणि सलामीला विराटला पाठवावं,’ असा सल्ला त्याने दिला आहे. भारतीय संघाने (Indian Team) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या टी-२० विश्वचषक सामन्यासाठी अलीकडेच आपला १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. ५ जूनला भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. (T20 World Cup 2024)
‘विराट तुमच्या संघात असेल तर तुम्हाला सातत्याची खात्री असते आणि रोहित कप्तान आहे. त्याच्या डोक्यात अनेक गोष्टी एकाच वेळी सुरू असतात. त्याला सामन्यात काय चाललंय हे कळायला फुरसत मिळेल आणि विराटने पॉवर प्लेमध्ये चांगला खेळ करून दाखवलेला आहे. तीच लय तो सुरू ठेवू शकेल,’ असा युक्तिवाद जाडेजाने केला आहे. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा – IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या पराभवाला जबाबदार कोण?)
जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अजय जाडेजाने हार्दिक पांड्यालाही आपला पाठिंबा जाहीर केला. ‘हार्दिक पांड्या देशातील दुर्मिळ खेळाडू आहे. जो तेज गोलंदाजी करू शकतो आणि वर फलंदाज म्हणूनही संघात स्थान मिळवू शकतो. त्यामुळे हार्दिकवर सगळ्यांचं लक्ष असतं. त्यातच मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कप्तानी स्वीकारताना जे झालं, ते पाहता तो अजून लोकांच्या नजरेसमोर आला. त्याला यातून सावरायला वेळ दिला पाहिजे. खेळाडू म्हणून तो योग्यच आहे,’ असं मत जाडेजाने मांडलं आहे. मोठ्या स्पर्धेसाठीचा संघ हा फक्त फॉर्म बघून नाही तर खेळाडूचं कौशल्य, लौकिक आणि गुणवत्ता बघून निवडला गेला पाहिजे, यावर जाडेजा ठाम आहे. आणि म्हणूनच विराट, रोहित, हार्दिक यांची निवड त्याला खटकत नाही. (T20 World Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community