-
ऋजुता लुकतुके
जमैकाचा स्टार ॲथलीट युसेन बोल्ट (Usain Bolt) आगामी टी-२० क्रिकेट विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) ब्रँड अँबेसिडर आहे. ८ ऑलिम्पिक पदकांचा राजा बोल्ट सतत वेगाशी स्पर्धा करतो आणि म्हणूनच क्रिकेटशी संबंध जोडताना त्याने टी-२० क्रिकेटला आपलंसं केलं आहे. वडिलांमुळे त्याची क्रिकेटशी ओळख झाली. लहानपणी तेज गोलंदाज होण्यासाठी तो सराव करत होता, हे किती जणांना माहीत आहे?
क्रिकेटशी एकेकाळी असलेल्या संबंधाला जागूनच त्याने स्पर्धेशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मी क्रिकेटवरच वाढलो. माझे वडील क्रिकेटचे चाहते होते आणि आहेत. मलाही तेज गोलंदाज व्हायचं होतं. मी क्रिकेटपटू झालो नाही. पण, स्पर्धेच्या निमित्ताने मी क्रिकेटशी जवळून जोडलो जाईन आणि याचा मला आनंद आहे,’ असं बोल्ट पीटीआयशी फोनवरून दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे.
(हेही वाचा – Navi Mumbai: बनावट नोटांच्या छापखान्यावर धाड घालून तरुणावर गुन्हा दाखल, २ लाखांच्या नोटा जप्त)
१०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत अजूनही विश्वविक्रम बोल्टच्या नावावर आहेत आणि २०१७ मध्ये निवृत्त झाला असला तरी ॲथलेटिक्स प्रकारात त्याचा करिश्मा अजूनही जिवंत आहे. सध्या टी-२० विश्वचषकाची (T20 World Cup 2024) स्टेडिअम पाहण्यासाठी तो अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. ‘लायटनिंग बोल्ट’ नावाने प्रसिद्ध असलेल्या बोल्टने न्यूयॉर्कमध्ये बॅटही हातात घेतली.
Star power 🤩
The Nassau County International Cricket Stadium was launched by the Men’s #T20WorldCup 2024 ambassador Usain Bolt, alongside some BIG sports personalities 👊
More images 👉 https://t.co/LoRLtegspB pic.twitter.com/ECbdiVLVQ7
— T20 World Cup (@T20WorldCup) May 15, 2024
(हेही वाचा – Sunil Chhetri to Retire : भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री जूनमध्ये होणार निवृत्त)
बोल्टला टी-२० क्रिकेटच जास्त आवडतं. ‘मला तर वेग आवडतो. त्यामुळे टी-२० क्रिकेट मला प्रिय आहे. मला वाटतं क्रिकेटला पुढे नेण्यासाठी ते सगळ्यात योग्य आहे. लारा आणि सचिनचा खेळ बघत मी मोठा झालो. आताच्या क्रिकेटपटूंमध्ये मला विराट कोहली जास्त आवडतो,’ असंही बोल्टने या मुलाखतीत सांगितलं.
तेज गोलंदाजांमध्ये युसेन बोल्टला (Usain Bolt) वसिम अक्रम विषयी आदर वाटतो. बोल्टने निवृत्तीनंतर खेळांचा प्रसार करण्यावर भर दिला आहे. फक्त ॲथलेटिक्स किंवा क्रिकेटच नाही तर फुटबॉल सामन्यांनाही तो ब्रँड अँबेसिडर म्हणून जातो. आणि विविध खेळांबद्दल तो बोलतोही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community