T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषका दरम्यान डीआरएस निर्णयावरून एवढा वाद का होतोय?

T20 World Cup 2024 : बांगलादेशला पंचांनी एक चौकार दिला नव्हता. आणि त्यांना नेमक्या ४ धावांच विजयासाठी कमी पडल्या 

156
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषका दरम्यान डीआरएस निर्णयावरून एवढा वाद का होतोय?
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषका दरम्यान डीआरएस निर्णयावरून एवढा वाद का होतोय?
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) बांगलादेश (Bangladesh) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) दरम्यानचा सामना चांगलाच रंगतदार झाला. आफ्रिकन संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद ११३ धावा केल्यावर बांगलादेशला ७ बाद १०९ धावांवर रोखलं. पण, बांगलादेशचा डाव सुरू असताना मैदानावरील आणि टीव्ही पंचांनीही दिलेला एक निर्णय वादग्रस्त ठरला आहे. त्या निर्णयामुळे बांगलादेशला चौकाराच्या ४ धावा मिळू शकल्या नाहीत. नेमका याच फरकाने बांगलादेशचा पराभव झाला. (T20 World Cup 2024)

बांगलादेशला (Bangladesh) शेवटच्या ४ षटकांत विजयासाठी २७ धावा हव्या होत्या. १७ व्या षटकातच डीआरएसचा एक नियम त्यांच्या विरोधात गेला. तौहिद ह्रदय आणि महमदुल्ला ही जोडी तेव्हा मैदानात होती. महमदुल्लाने फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू पॅडला लागून सीमारेषेपार गेला. आफ्रिकन संघाने अपील केल्यावर मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिलं. पण, महमदुल्लाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. टीव्ही रिप्ले पाहिल्यानंतर आणि चेंडू ट्रॅक केल्यानंतर तो यष्टीच्या दूरून जात असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. आणि महमदुल्ला नाबाद ठरला. तो बाद होता होता राहिला. पण, लेगबाईज म्हणून मिळालेल्या चार धावा मात्र हातच्या गेल्या.  (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Pak : ‘माझ्या ७ धावा शेवटी निर्णायक ठरल्या,’ – मोहम्मद सिराज)

आयसीसीच्या ताज्या नियमावलीनुसार, एकदा फलंदाज बाद दिला गेला की, पुढे चेंडू बाद ठरतो. इथं मैदानावरील पंचांचा निर्णय टीव्हीवरील पंचांनी फिरवला. तरी नियमाप्रमाणे चेंडू बाद तो बादच असतो. त्यामुळे महमदुल्ला नाबाद राहिला तरी त्या ४ धावा त्यांना मिळाल्या नाहीतच. आणि याच नियमावर आता माजी खेळाडू टीका करत आहेत. कारण, याच चार धावा बांगलादेशच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. (T20 World Cup 2024)

 चुकीच्या नियमाचा फटका बांगलादेश संघाला बसला, अशीच भावना सोशल मीडियावर उमटत आहे. भारतातही काही माजी खेळाडूंनी बांगलादेशला पाठिंबा देऊ केला आहे. माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने लगेच ट्विटरवर आपलं मत व्यक्त केलं. ‘महमदुल्लाला चुकीच्या पद्धतीने बाद दिलं होतं. आणि मग चेंडू सीमारेषेपार गेला. फलंदाज बाद नसेल तर चेंडू बाद व्हायला नको. दक्षिण आफ्रिकेनं नेमक्या त्याच फरकाने हा सामना जिंकला. मी बांगलादेश संघाच्या चाहत्यांबरोबर आहे,’ असं जाफरने म्हटलं आहे. (T20 World Cup 2024)

आयसीसीचा नियम याविषयी काय सांगतो?

३.७.१ – खेळाडूंनी एखाद्या निर्णयाविरोधात अपील केलं असेल आणि पंचांनी बाद दिलेला निर्णय तिसऱ्या पंचांनी फिरवला तरीही तो चेंडू आधी फलंदाजाला बाद दिल्यानंतर बादच ठरतो. फलंदाजी करणाऱ्या संघाला पंचांच्या बदललेल्या निर्णयाचा फायदा मिळेल. पण, धावांचा फायदा मिळणार नाही. (T20 World Cup 2024)

३.७.२ – मैदानावरील पंचांनी नाबादचा दिलेला निर्णय तिसऱ्या पंचांनी फिरवून फलंदाजाला बाद दिलं गेलं, तर चेंडू तिथल्या तिथे बाद ठरतो. त्यानंतर चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव घेता येणार नाही. जर धावा झाल्याच तर त्या मोजल्या जाणार नाहीत.  (T20 World Cup 2024)

२०.१.१.३ – या नियमाला बाद चेंडू किंवा डेड बॉलचा नियम म्हणतात. फलंदाज बाद झाल्या झाल्या तो चेंडू बाद होईल असं हा नियम सांगतो.  (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.