T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंकेत होणार टी-२० चा पुढील विश्वचषक 

T20 World Cup 2026 : आताच्या स्पर्धेत सुपर ८ गाठलेले संघ पुढील स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरतील

225
T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंकेत होणार टी-२० चा पुढील विश्वचषक 
T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंकेत होणार टी-२० चा पुढील विश्वचषक 
  • ऋजुता लुकतुके

टी२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेमध्ये कमकुवत समजल्या जाणाऱ्या संघांनीही आपली ताकद दाखवली. अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता टी२० विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) साठी पात्र ठरलेल्या संघांची यादी आली आहे. यामध्ये एकूण १२ संघ आहेत. याशिवाय ८ संघ पात्रता फेरीतून प्रवेश घेणार आहेत.

(हेही वाचा- 800 वर्षांनंतर नालंदा विद्यापीठाचं वैभव परत आलं, Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन; नवीन कॅम्पसचं वैशिष्ट्य काय?)

२०२६ ची टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2026) भारत आणि श्रीलंकेत (India and Sri Lanka) होणार आहे. या विश्वचषकासाठी भारत आणि श्रीलंकेसोबतच (India and Sri Lanka) पाकिस्तान आणि बांगलादेशही त्यासाठी पात्र ठरले आहेत. या यादीत वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचीही नावे आहेत. टी२० विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) साठी अमेरिका देखील भारतात येणार आहे. टी२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ साठी अमेरिकेचा संघही पात्र ठरला आहे. यासोबतच अफगाणिस्ताननेही एन्ट्री घेतली आहे. अफगाणिस्तानने एकुण ४ सामने खेळले आहेत. यामध्ये तीन सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला.  (T20 World Cup 2026)

टी२० विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) भारत आणि श्रीलंकेमध्ये (India and Sri Lanka) आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये १२ संघ पात्र ठरले आहेत. तर ८ संघ पात्रता फेरीतून येतील. २० संघांमध्ये एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचे अजून वेळापत्रक जाहीर झालेले नाही. (T20 World Cup 2026)

(हेही वाचा- Thakur Village Kandivali East : कांदिवली पूर्व येथे वसलेले राहण्यासाठी परिपूर्ण ठिकाण म्हणजे ठाकूर व्हिलेज)

टी-२० विश्वचक २०२६ साठी आतापर्यंत पात्र ठरलेले संघ, 

भारत (India), श्रीलंका (Sri Lanka), ऑस्ट्रेलिया (Australia), अफगाणिस्तान (Afghanistan), बांगलादेश (Bangladesh), इंग्लंड (England), दक्षिण आफ्रिका (South Africa), यूएसए (USA), वेस्ट इंडीज (West Indies), न्यूझीलंड (New Zealand), आयर्लंड (Ireland) व पाकिस्तान (Pakistan) (T20 World Cup 2026)

युरोप पात्रता स्पर्धेमधून २ संघ, ईस्ट एशिया पॅसिफिक पात्रता व अमेरिकन पात्रता स्पर्धेमधून प्रत्येकी १-१ संघ आणि  आशिया पात्रता  व आफ्रिका पात्रता स्पर्धेमधून प्रत्येकी २-२ संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहेत. (T20 World Cup 2026)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.