T20 World Cup: प्लेअर ऑफ टूर्नामेंटसाठी ९ नावे जाहीर! भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश, येथे करा VOTE

124

टी-२० विश्वचषकातून भारताचे आव्हान संपुष्टात आले असले तरीही ICC ने जाहीर केलेल्या प्लेअर ऑफ टूर्नामेंटच्या ९ खेळाडूंच्या यादीत भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

( हेही वाचा : T20 World Cup : भारताच्या पराभवानंतर सचिनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, पराभव सुद्धा… )

ICC ने जाहीर केलेल्या ९ प्लेअर्सची नावे

शादाब खान – पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आहे. सहा सामन्यामध्ये त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत.

शाहिन आफ्रिदी – शाहिन आफ्रिदीची टी२० विश्वचषकाची सुरूवात फारशी चांगली झाली नसली तरी अखेरच्या काही सामन्यात त्याने पुनरागमन केले आहे. त्याने पुढच्या १० सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या.

सॅम कुरन – इंग्लंडचा सॅम कुरन डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. ५ सामन्यांत त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत.

जोस बटलर – इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने पाच सामन्यांत दोन अर्धशतकांसह १९९ धावा केल्या आहेत.

अ‍ॅलेक्स हेल्स – जॉनी बेअरस्टोच्या दुखापतीमुळे अ‍ॅलेक्स हेल्सची वर्ल्डकपमध्ये एन्ट्री झाली आणि त्याने ५ सामन्यात २११ धावा केल्या. भारताविरुद्ध सुद्धा त्याने नाबाद खेळी केली.

सिकंदर राजा – झिम्बाब्वेच्या या खेळाडूने यंदा कमाल केली असून त्याने २१९ धावा केल्या आहेत.

वनिंदू हसरंगा – या श्रीलंकेच्या खेळाडूने सर्वाधिक १५ विकेट्स घेतल्या आहे. मागील वर्ल्डकपमध्येही त्याने १६ विकेट्स घेतल्या होत्या.

विराट कोहली – विराट कोहलीने ९८.६६ च्या सरासरीने सर्वाधिक २९६ धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विराटने नाबाद ८२ धावांची खेळी केली आहे.

सूर्यकुमार यादव – मधल्या फळीत सर्वात उत्तम कामगिरी भारताच्या सूर्यकुमार यादवने केली आहे. त्याने ६ सामन्यांत २३९ धावा केल्या आहेत.

येथे करा व्होट

https://www.icc-cricket.com/awards/player-of-the-tournament

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.