T20 World Cup, Afg vs Ban : तालिबानच्या मंत्र्यांनी केलं रशिद खानचं अभिनंदन 

T20 World Cup, Afg vs Ban : अफगाणिस्तानच्या बाद फेरीतील प्रवेशानंतर देशात जल्लोषाचं वातावरण आहे 

188
T20 World Cup, Afg vs Ban : तालिबानच्या मंत्र्यांनी केलं रशिद खानचं अभिनंदन 
T20 World Cup, Afg vs Ban : तालिबानच्या मंत्र्यांनी केलं रशिद खानचं अभिनंदन 
  • ऋजुता लुकतुके

बांगलादेशचा ८ धावांनी सनसनाटी पराभव करत अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup) उपान्त्य फेरीत प्रवेश केला. आता गुरुवारी त्यांची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे. मंगळवारी मध्यरात्री सामन्याचा निकाल लागल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये एकच जल्लोष सुरू झाला आहे. तिथल्या तालिबानी प्रशासनातील परराष्ट्र व्यवहारमंत्री आमीर खान (Aamir Khan) मुताकी यांनी संघाशी संपर्क करत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. (T20 World Cup, Afg vs Ban)

(हेही वाचा- T20 World Cup, Afg vs Ban : अफगाण खेळाडूंना जेव्हा मैदानातच अश्रू अनावर झाले!)

मुताकी यांनी कर्णघार रशिद खानबरोबर व्हीडिओ कॉल केला. तर अफगाणिस्तान क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावर हा व्हीडिओ पोस्ट केला. ‘संघाने इथून पुढेही अधिक चांगलं आणि मोठं यश मिळवावं,’ अशी सदिच्छा मुताकी यांनी व्यक्त केली. दोघांमध्ये झालेला संवाद सोशल मीडियावरील व्हीडिओत तुम्ही पाहू शकता. (T20 World Cup, Afg vs Ban)

अफगाणिस्तानच्या विजयानंतर मायदेशात लोकांनी सण साजरा करायला सुरुवात केली. खासकरून सरकारी कार्यालयांमध्ये जल्लोष सुरू झाला. अफगाणिस्तान क्रिकेट असोसिएशननेच असे काही व्हीडिओ शेअर केले आहेत. (T20 World Cup, Afg vs Ban)

अफगाणिस्तानने बांगलादेशवरील विजयानंतर ४ गुणांसह पहिल्या गटात दुसरं स्थान मिळवलं. आता उपान्त्य लढतीत गुरुवारी त्यांची गाठ दुसऱ्या गटातील अव्वल संघ दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे. त्रिनिदादमध्ये भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजता हा सामना रंगणार आहे. (T20 World Cup, Afg vs Ban)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.