T20 World Cup, Afg vs Ban : अफगाण खेळाडूंना जेव्हा मैदानातच अश्रू अनावर झाले!

T20 World Cup, Afg vs Ban : आयसीसी स्पर्धेच्या उपान्त्य फेरीची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ आहे 

322
T20 World Cup, Afg vs Ban : अफगाण खेळाडूंना जेव्हा मैदानातच अश्रू अनावर झाले!
T20 World Cup, Afg vs Ban : अफगाण खेळाडूंना जेव्हा मैदानातच अश्रू अनावर झाले!
  • ऋजुता लुकतुके

एखादा खेळ लोकांना एकत्र आणतो असं म्हटलं जातं. अफगाणिस्तानच्या (T20 World Cup, Afg vs Ban) बाबतीत तेच घडलंय. अफगाणिस्तानने सुपर ८ मधील शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा ८ धावांनी पराभव केला. गटात दुसरं स्थान पटकावत उपान्त्य फेरीत प्रवेश नक्की केला. खरंतर अफगाणिस्तानने एका दगडात दोन पक्षी मारले. एकदिवसीय विश्वचषकात त्यांना उपान्त्य फेरीपासून रोखणाऱ्या ऑस्ट्रेलियाला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. आणि यावेळी स्वत: बाद फेरीत प्रवेश केला. त्यानंतर सेंट ल्युसियाचं मैदान आणि मायदेश अफगाणिस्तानात जे घडलं ते ईदच्या सोहळ्यापेक्षा कमी नव्हतं.  (T20 World Cup, Afg vs Ban)

(हेही वाचा- Zika Virus: पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; काय काळजी घ्याल ?)

बांगलादेशला ११५ धावांचा पाठलाग करायचा होता. पावसाने चारवेळा व्यत्यय आणला. पण, अखेर सामन्याचा निकाल लागू शकला हे अफगाणिस्तानचं नशीब. निकाल लागलाही अफगाणिस्तानच्या बाजूने. त्यांनी बांगलादेशला १०६ धावांत गुंडाळत विजय साजरा केला. शेवटचा बळी करंतर बांगलादेशने रिव्ह्यू मागितला होता. पण, अफगाणिस्तानने आपला जल्लोष त्यापूर्वीच सुरू केला होता.  (T20 World Cup, Afg vs Ban)

 सुरुवातीचा आवेग ओसरल्यानंतर खेळाडूंनी आपल्या भावनांनाही वाट मोकळी करून दिली. इथं मैदानावर हे चित्र होतं तर दूर अफगाणिस्तानमध्येही लोकांनी आनंद साजरा करायला सुरुवात केली. लोक रस्त्यावर जमले. मिठाई वाटणं सुरू झालं.  रस्त्यांवर अक्षरश: ईदचं वातावरण होतं. (T20 World Cup, Afg vs Ban)

अफगाणिस्तानसाठी रशिद खान (rashid khan) आणि नवीन उल हक (Naveen-ul-Haq) विजयाचे हीरो ठरले. दोघांनी प्रत्येकी चार बळी मिळवले. तर फलंदाजीत रहमनुल्ला गुपबाझने (Rahmanullah Gurbaz) ४३ धावा केल्या. बांगलादेशकडून लिट्टन दासने नाबाद ५४ धावा केल्या. पण, दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही.  (T20 World Cup, Afg vs Ban)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.