T20 World Cup, Eng bt WI : वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव करत इंग्लंडची सुपर ८ ला दणक्यात सुरुवात

T20 World Cup, Eng bt WI : फिल सॉल्टने रोमारिओ शेफर्डच्या एका षटकात ३० धावा वसूल केल्या.

124
T20 World Cup, Eng bt WI : वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव करत इंग्लंडची सुपर ८ ला दणक्यात सुरुवात
  • ऋजुता लुकतुके

साखळी स्पर्धेत जेमतेम कामगिरी झालेल्या इंग्लंड संघाने अखेर सुपर ८ मध्ये आपला खरा टी-२० बाणा दाखवून दिला. वेस्ट इंडिज विरुद्ध आधी त्यांनी नेटकी गोलंदाजी केली. त्यानंतर १८० धावांचं आव्हान ८ गडी आणि १५ चेंडू राखून पार केलं. यात फिल सॉल्टचा झंझावात निर्णायक ठरला. सलामीला येत त्याने ४७ चेंडूंत ८७ धावा केल्या त्या ५ षटकार आणि ७ चौकार ठोकून. इंग्लिश डावाच्या सोळाव्या षटकांत त्याने रोमारिओ शेफर्डच्या षटकात ३ षटकार आणि ३ चौकारांची आतषबाजी केली आणि सामनाच फिरवला. त्या आधी इंग्लंडला निदान षटकामागे ९ धावांची गरज होती. पण, सॉल्टने पुढील दीड षटकात सामनाच संपवला. (T20 World Cup, Eng bt WI)

जोस बटलरने २५ आणि जॉनी बेअरस्टोने नाबाद ४५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. सॉल्ट आणि बेअरस्टो यांनी तिसऱ्या गड्यासाठी नाबाद ९७ धावांची भागिदारी केली ती फक्त ३९ चेंडूंत. निकोलस पुरणने यष्टीमागे एकदा सॉल्ट आणि एकदा बटलरला जीवदान दिलं, ते विंडिजला चांगलंच महागात पडलं. (T20 World Cup, Eng bt WI)

(हेही वाचा – Investment Alert : वॉट्‌सॲप, टेलिग्रामवरील सल्ल्यानुसार गुंतवणूक करणाऱ्यांना एनएससीने केलं सावध)

त्यापूर्वी वेस्ट इंडिजने पहिली फलंदाजी करताना ६ बाद १८० धावा केल्या त्या आघाडीच्या फळीच्या जोरावर. इंग्लंडने पहिली फलंदाजी करण्याचं आव्हान दिल्यावर खरंतर विंडिज फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत होते. मोठी भागिदारी रचण्यात ते अपयशी ठरले. पण, जॉनसन चार्ल्स (३८), निकोलस पुरण (३६) आणि पॉवेल (३६) या पहिल्या पाचातील तीन फलंदाजांनी निदान चांगली सुरुवात केली आणि त्यामुळे विंडिज संघ १८० धावा करू शकला. तळाला रुदरफोर्डनेही १५ चेंडूंत २८ धावा करत विंडिजला वेगाने धावा वाढवून दिल्या. इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चर, लिव्हिंगस्टोन, मोईन अली आणि आदील रशिद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. फिल सॉल्टला सामनावीराचा किताब मिळाला. (T20 World Cup, Eng bt WI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.