T20 World Cup : सेमीफायनलपूर्वी भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी!

126

टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारतीय संघाने चांगली कामगिरी करून सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. गुरूवारी भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघासाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे.

( हेही वाचा : T20 World Cup : सेमीफायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडचे आव्हान; पण टीम इंडियाचे यामुळे वाढलंय टेन्शन)

महत्त्वाचा गोलंदाज दुखापतग्रस्त 

इंग्लंडचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान (david malan) आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. मार्क वूड सराव सत्रात सुद्धा सहभागी झाला नव्हता. त्यामुळे गुरूवारी त्याच्या खेळण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मार्क वूड हा 154.74kph वेगाने चेंडू टाकणारा विश्वचषकातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

मार्क वूडने या टी-२० स्पर्धेत आतापर्यंत ४ सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेतल्या आहेत. वर्ल्डकपआधी त्याच्या दोन्ही शस्त्रक्रिया झाल्या होत्या. या शस्त्रक्रियेमुळे त्याला कित्येक दिवस क्रिकेटापासून दूर रहावे लागले होते. यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन फलंदाजांसाठी सुद्धा वूड डोकेदुखी ठरला आहे त्यामुळे आता वूड खेळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

रोहित शर्मा खेळणार की नाही? 

दरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माला सुद्धा सराव सत्रावेळी दुखापत झाली आहे. सध्या भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा रोहितकडे आहे. तर उपकर्णधार के.एल.राहूल आहे. जर रोहित दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर संघाची कमान के.एल.राहूलकडे सोपवली जाईल. परंतु मागच्या काही सामन्यातील राहुलची कामगिरी पाहता, हार्दिक पांड्याच्या खांद्यावर कर्णधार पदाची धुरा सोपवली जाऊ शकते. अद्याप तरी रोहित पुढचा सामना खेळणार की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.