भारत विरुद्ध इंग्लंड या सेमीफायनल सामन्याला भारतीय वेळेनुसार १.३० वाजता सुरूवात होणार असून तत्पूर्वी इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताला पहिल्या डावात फलंदाजी करावी लागणार आहे. दरम्यान, भारतीय संघात ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ओव्हलच्या मैदानात ज्या संघाने आतापर्यंत टॉस जिंकला आहे त्या संघांनी सामना गमावल्याचा इतिहास आहे. या मैदानावर 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले. ते सर्वच्या सर्व सामने नाणेफेक गमावणाऱ्या संघाने जिंकले.
भारताकडे पहिली फलंदाजी असल्याने एक मोठी धावसंख्या उभारण्याची संधी भारताकडे आहे. यामुळेच यष्टीरक्षक ऋषभ पंतला संघात कायम ठेवण्यात आले आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार
Join Our WhatsApp Community