T20 World Cup : इंग्लंड की पाकिस्तान कोण जिंकणार महामुकाबला, ३० वर्षांपूर्वीचा इतिहास काय सांगतो?

बाबर आझमच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने आणि जोस बटलरच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या इंग्लंड संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. रविवारी १३ नोव्हेंबरला हा अंतिम सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे दुसऱ्यांचा विश्वचषक जिंकण्याचा बहुमान कोणाला मिळणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.

( हेही वाचा : T20 World Cup : भारतीय संघावर चौफेर टीका; सचिनने टीकाकारांना सुनावले! म्हणाला, एका पराभवामुळे… )

३० वर्षांचा इतिहास

१९९२ मध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने विश्वचषक जिंकला होता यावेळी सुद्धा याच दोन संघांमध्ये फायनल रंगली होती. त्यावेळी पाकिस्तान वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे ३० वर्षांपूर्वीचा तो बदला घेण्यासाठी आता जोस बटलरची टीम सुद्धा सज्ज झाली आहे. पाकिस्तानचा यंदाचा प्रवास सुद्धा १९९२ च्या वर्ल्डकप स्पर्धेसारखाच आहे.

पाऊस ठरणार का व्हिलन?

अंतिम सामन्यात ९५ टक्के पावसाची शक्यता असून २५ मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मेलबर्नमध्ये जवळपास १०० टक्के पावसाची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि ढगांच्या गडगडाटाची शक्यता खूप जास्त आहे. पावसामुळे दोन्ही दिवस खेळ झाला नाही तर मात्र पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या विभागून ट्रॉफी दिली जाणार आहे, असे नियम ICC ने जारी केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here