-
ऋजुता लुकतुके
भारत आणि ऑस्ट्रेलियाची (Ind bt Aus) लढत इथून पुढे कुठेही झाली तरी त्याची तुलना एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्याशी केली जाईल. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानपेक्षा भारतीयांसाठी ही लढत हाय – प्रोफाईल झाली आहे. आणि अशा या टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup) लढतीत भारताने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी दमदार पराभव केला. या स्पर्धेत भारत हा एकमेव अपराजीत संघ आहे. तर या पराभवानंतर आता ऑस्ट्रेलियन संघाला अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश या सामन्यावर नजर ठेवावी लागणार आहे. कारण, तो सामना अफगाणिस्तानने जिंकला तर ४ गुणांसह ते बाद फेरीत जातील. आणि ऑस्ट्रेलियाचा गाशा गुंडाळेल.
भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून त्यांनी पहिली गोलंदाजी घेतली. आणि हा निर्णय चांगलाच अंगलट आला असं म्हणवं लागेल. विराट कोहली (Virat Kohli) शून्यावर बाद झाला. पण, रोहित शर्माची (Rohit Sharma) बॅट अशी काही तळपली की, दक्षिण आफ्रिका – इंग्लंड सामन्यात गोलंदाजांना साथ देणारी ही खेळपट्टी एकदम सपाट वाटायला लागली. भारताचं अर्धशतक फलकावर लागलं तेव्हा ४६ धावा एकट्या रोहितच्या होत्या. (Rohit Sharma) षटकार तर तो झोपेतही मारू शकत होता. शेवटी मायकेल स्टार्कच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ४१ चेंडूंत ९२ धावा करताना ८ षटकार आणि ७ चौकार मारले. (T20 World Cup)
(हेही वाचा – Exam Scam: NEET पेपर फुटीचे लातूर कनेक्शन, दुसरा शिक्षक ताब्यात!)
रोहित खालोखाल हार्दिकने नाबाद २७ तर शिवम दुबेनं २८ आणि सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या. गोलंदाजांची कामगिरी आज बघण्यासारखी नव्हतीच. अपवाद हेझलवूड आणि भारतासाठी कुलदीप यादव.
India advance to the semi-finals of the #T20WorldCup 2024 🔥🇮🇳
Rohit Sharma’s marvellous 92 combined with a superb bowling effort hand Australia a defeat in Saint Lucia 👏#AUSvIND | 📝: https://t.co/lCeqHIMg1Y pic.twitter.com/HklyIAXzvL
— ICC (@ICC) June 24, 2024
भारताने पहिली फलंदाजी करताना ६ बाद २०५ धावा केल्यानंतर ट्रेव्हिस हेडने (Travis Head) पुन्हा एकदा भारताला त्रास दिला. आणि तो मैदानात होता तोपर्यंत ऑस्ट्रेलियाला आशाही होत्या. त्याने ४३ चेंडूंत ७६ धावा केल्या. पण, अखेर बुमराहने त्याला बाद केलं. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर हेड भारताविरुद्ध पहिल्यांदा बाद झाला. भारताकडून कुलदीपने सुरेख गोलंदाजी करताना २४ धावांत २ बळी मिळवले. मिचेल मार्श आणि मॅक्सवेलचे त्याने मिळवलेले बळी हे अगदी योग्य वेळी मिळवलेले होते. त्यानंतर अर्शदीपने ३७ धावांत ३ बळी मिळवले.
भारतीय संघाची उपान्त्य लढत आता इंग्लंडशी होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तान हरण्याची आशा करावी लागणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community