T20 World Cup, Ind vs Afg : अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव करत भारताची सुपर ८ मध्ये दणक्यात सुरुवात 

T20 World Cup, Ind vs Afg : विजयासाठी १८२ धावांचा पाठलाग करताना अफगाण संघ १३४ धावांत बाद झाला

173
T20 World Cup, Ind vs Afg : अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव करत भारताची सुपर ८ मध्ये दणक्यात सुरुवात 
T20 World Cup, Ind vs Afg : अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव करत भारताची सुपर ८ मध्ये दणक्यात सुरुवात 
  • ऋजुता लुकतुके

वेस्ट इंडिजमधला सुपर ८ चा पहिला पेपर भारतीय संघाने विशेष प्रावीण्य मिळवत सोडवला. नाणेफेकीपासून सगळं भारताच्या बाजूने घडत गेलं. त्यामुळे भारताने आधी ७ बाद १८१ धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघाला ९ बाद १३३ धावांवर रोखलं. भारतीय संघाने स्पर्धेत अपराजीत राहण्याचा लौकिक कायम ठेवला आहे. (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- Election : मतदानाच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर)

रोहित (Rohit) ८ धावांवर बाद झाल्यामुळे भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण, यावेळी विराट कोहलीने (Virat Kohli) थोडाफार फॉर्म परत मिळवला. २४ चेंडूंत त्याने २४ धावा केल्या. पण, रशीद खानच्या (Rashid Khan) गोलंदाजीवर एक खराब फटका खेळून तो बाद झाला. रिषभ पंतलाही रशिदने २० धावांत पायचीत पकडलं. रशीदने विराट (Virat Kohli), पंत (Pant) आणि शिवम (Shivam) हे तीन तगडे फलंदाज बाद करून भारताची मधली फळी कापून काढली. पण, त्यानंतर सूर्यकुमार (Suryakumar) आणि हार्दिक (Hardik) ही जोडी जमली. दोघांनी ६० धावांची भागिदारी करून भारताची गाडी परत रुळावर आणली.  सूर्यकुमारने (Suryakumar) आव्हानात्मक खेळपट्टीवर २७ चेंडूंत ५३ धावा करत भारताला १८० धावांच्या जवळ आणलं. (T20 World Cup, Ind vs Afg)

अफगाणिस्तानतर्फे रशीद खानने (Rashid Khan) २६ धावांत ३ आणि फारुखीने ३३ धावांत ३ बळी मिळवले. (T20 World Cup, Ind vs Afg)

 अफगाणिस्तानचा डाव सुरू झाला तेव्हा बुमराचा (Bumrah) खेळ रंगात आला. पहिल्याच षटकात त्याने धोकादायक वाटणाऱ्या रहमनुल्ला गुरबाझला (Rahmanullah Gurbazla) बाद केलं. रोहितने त्याला तीन टप्प्यात वापरलं. या तीनही वेळा त्याने पहिल्या षटकांत बळी मिळवला. झझाई आणि झदरानलाही त्याने बाद केलं. त्याच्या गोलंदाजीचं पृथ:करण होतं ४ षटकं, १ निर्धाव, ७ धावा आणि ३ बळी. संघात पुनरागमन करणाऱ्या कुलदीपनेही मोक्याच्या क्षणी दोन गडी बाद केले. तळाचे फलंदाज अर्शदीपने बाद केले. त्याने ३६ धावांत ३ बळी मिळवले.  (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- १२ हजार नावे पुरवणी मतदार यादीतून वगळली, Anil Parab यांचा आरोप)

तर अक्षऱ पटेल (Akshar Patel) आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रत्येकी एक बळी मिळवला. सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) सामनावीराचा पुरस्कार मिळाला. भारताचा पुढील सामना २२ तारखेला बांगलादेशशी होणार आहे. (T20 World Cup, Ind vs Afg)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.