T20 World Cup, Ind vs Afg : भारत, अफगाणिस्तान लढतीतील आकड्यांचा खेळ, कोण फॉर्मात, कुणी जिंकले किती सामने?

T20 World Cup, Ind vs Afg : भारतासाठी आता वेस्ट इंडिजचा टप्पा सुरू होतोय 

99
T20 World Cup, Ind vs Afg : भारत, अफगाणिस्तान लढतीतील आकड्यांचा खेळ, कोण फॉर्मात, कुणी जिंकले किती सामने?
T20 World Cup, Ind vs Afg : भारत, अफगाणिस्तान लढतीतील आकड्यांचा खेळ, कोण फॉर्मात, कुणी जिंकले किती सामने?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ सुपर ८ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध (T20 World Cup, Ind vs Afg) आपला पहिला सामना खेळेल, तेव्हा एक महत्त्वाचा बदल जाणवेल तो खेळपट्टीत. अमेरिकेतील खडतर खेळपट्टीच्या तुलनेत भारतीय संघासाठी इथं चांगलं क्रिकेटचं वातावरण असेल. त्यामुळे नाणेफेक जिंकली तर पहिली फलंदाजी घेऊन मोठी धावसंख्या रचायची ही क्रिकेटमधील रुढ प्रथा इथं पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत सूर हरवलेले रोहीत आणि विराट सारखे ज्येष्ठ फलंदाज पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा करू शकतात.  (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा – MPSC : टंकलेखन कौशल्य चाचणीचे १ ते १३ जुलै दरम्यान आयोजन)

त्याचबरोबर संघात आता आणखी एका फिरकीपटूचा समावेशही होऊ शकतो. तो फिरकीपटू कुलदीप यादव असेल असंही दिसतंय. आता दोन्ही संघातील आकडेवारी बघितली तर ती अर्थातच भारताच्या बाजूने आहे. ७ पैकी ७ ही सामने भारताने जिंकले आहेत. पण, त्याचवेळी दोन संघांमध्ये बंगळुरू इथं झालेला शेवटचा सामना हा टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील असा एकमेव सामना आहे जिथे दोनदा सुपर ओव्हर झाली होती. (T20 World Cup, Ind vs Afg)

 आताही दोन्ही संघांचा फॉर्म बघितला तर शेवटच्या ५ सामन्यांपैकी पाचही भारताने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तानने शेवटचा एक अपवाद वगळता आधीचे चार जिंकले आहेत. भारताची या सामन्यात दुहेरी रणनीती असू शकते, (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा – पहिले तेलुगू नाटककार Chandala Kesavadasu)

पहिली फलंदाजी, मोठी धावसंख्या

वेस्ट इंडिजमधील वातावरण क्रिकेट आणि फलंदाजीला पोषक आहे. बार्बाडोसची खेळपट्टीही या विश्वचषकात मोठे फटके खेळणाऱ्यांना साथ देतेय. त्यामुळे भारत काय किंवा अफगाणिस्तान काय पहिली फलंदाजी घेऊन मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील हे नक्की आहे. या मैदानावर झालेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध २०१ धावा केल्या होत्या अफगाणिस्तानचा संघ पहिली फलंदाजी करताना आत्मविश्वासपूर्ण असतो. पण, धावांचा पाठलाग करताना गडबडतो. आताही फलंदाजीत त्यांचा जोर गुरबाझ आणि इब्राहिम झरदानवर असेल. तर भारताला अपेक्षा असेल ती विराट आणि रोहीतकडून. (T20 World Cup, Ind vs Afg)

फिरकीपटूंना संधी 

वेस्ट इंडिजमध्ये फिरकीपटूंना चांगली साथ मिळते. खासकरून चेंडू बोटांनी वळवणारे रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Akshar Patel) यांना चांगली संधी असेल. तर भारत आणखी एक फिरकीपटू खेळवण्यावरही विचार करू शकतो. तसं झालं तर सिराज (Siraj) किंवा अर्शदीप (Arshdeep) यांच्यापैकी एकाला बसवून कुलदीप (Kuldeep) संघात येऊ शकतो.  (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा – Maharashtra Monsoon : पुढील चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडणार)

महत्त्वाच्या लढती

राशीद खान (Rashid Khan) आणि भारताची अख्खी मधली फळी ही पहिली लक्षवेधी लढत असेल. खासकरून रिषभ पंत (Rishabh Pant), शिवम दुबे (Shivam Dubey) त्याला कसं खेळतात यावर भारतीय संघाची धावसंख्या अवलंबून असेल. तसंच अक्षर आणि कुलदीपला अफगाण फलंदाज कसं खेळतात यावर त्यांची धावसंख्या अवलंबून असेल. (T20 World Cup, Ind vs Afg)

फझलहक फारुखीने जितका त्रास रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलाय तितका आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर कुणीही नाही दिलेला. एकूणच डावखुऱ्या तेज गोंलदाजीला रोहीत गडबडतो. ते एक द्वंद्व बार्बाडोसमध्ये पाहायला मिळेल. तर विराट (Virat Kohli) आणि नवीन उल हक यांचं द्वंद्वही आयपीएलपासून चालत आलं आहे. सामना बार्बाडोसला किंग्जटन ओव्हलला भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. (T20 World Cup, Ind vs Afg)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.