T20 World Cup, Ind vs Afg : विराट कोहलीला ‘हा’ विक्रम मोडण्याची संधी

T20 World Cup, Ind vs Afg : साखळी सामन्यांतील अपयश पुसून काढण्यासाठी विराटने बुधवारी नेट्समध्ये कसून सराव केला 

121
T20 World Cup, Ind vs Afg : विराट कोहलीला ‘हा’ विक्रम मोडण्याची संधी
T20 World Cup, Ind vs Afg : विराट कोहलीला ‘हा’ विक्रम मोडण्याची संधी
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली या टी-२० विश्वचषकात (T20 World Cup, Ind vs Afg) साखळी सामन्यांमध्ये अपयशी ठरला. मात्र, सुपर ८ चे सामने आता वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. विराट त्यासाठी जोरदार सरावही करतोय. त्याच्याकडून जोरदार नेट प्रॅक्टीस सुरु आहे.  पुन्हा फॉर्म मिळवण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) प्रयत्न  करतोय. भारत सुपर ८ च्या पहिल्या गटात आहे. भारत आणि अफगाणिस्तानचा सामना २० जूनला होणार आहे. या सामन्यात फलंदाजीतील एक विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी विराटकडे आहे. (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- Mumbai Rain Update: मुंबई-ठाण्यासह पालघरमध्ये मुसळधार पाऊस, मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत)

विराट कोहलीला (Virat Kohli) साखळी सामन्यांत मिळून फक्त ५ धावा करता आल्या आहेत. आता विराट कोहली सुपर ८ मध्ये कमबॅक करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. अफगाणिस्तान विरुद्ध कोहलीला फॉर्म गवसण आवश्यक आहे. साखळी सामन्यांतील खराब कामगिरी विसरुन विराट कोहलीनं अफगाणिस्तान विरुद्ध ८ चौकार मारल्यास तो टी २० विश्वचषकात सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरेल. आतापर्यंत विराटने साखळी सामन्यांत फक्त एक चौकार ठोकला आहे. (T20 World Cup, Ind vs Afg)

श्रीलंकाचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) टी २० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. जयवर्धनेनं १११ चौकार मारले आहेत. या यादीत विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीनं आतापर्यंत १०४ चौकार मारले आहेत. आता विराटनं आणखी ८ चौकार मारल्यास तो पहिल्या स्थानावर येईल. (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- Vadhavan Port : वाढवण येथे 76,200 कोटी रुपयांचे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट बंदर होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता)

टी २० विश्वचषकात (T20 World Cup, Ind vs Afg) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर सर्वाधिक धावा आहेत. कोहलीनं टी २० विश्वचषक स्परर्धेच्या इतिहासात ३० सामन्यात २८ डावांत ६७.४१ च्या सरासरीनं १३०.५२ च्या स्ट्राइक रेटनं १,१४६ धावा केल्या आहेत. विराटनं १४ अर्धशतकं केली असून ८९ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. कोहलीनं १०४ चौकारांसह २८ षटकार मारले आहेत. (T20 World Cup, Ind vs Afg)

आकाश चोप्रानं विराट कोहलीला (Virat Kohli) एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. विराट कोहलीनं यापूर्वीच्या तीन सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाजी केलेली आहे. विराट कोहलीनं खेळपट्टीवर स्वत:ला  थोडा वेळ दिल्यास  त्याला सूर गवसेल, असं आकाश चोप्रानं म्हटलं आहे. वेस्ट इंडिजच्या (West Indies) खेळपट्ट्या अमेरिकेच्या तुलनेत चांगल्या आहेत. अमेरिकेत गोलंदाजांना फायदा मिळत होता. वेस्ट इंडिजमध्ये फलंदाजांना फायदा मिळू शकतो, असं आकाश चोप्रानं म्हटलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात यशस्वी होते का ते पाहावं लागणार आहे. (T20 World Cup, Ind vs Afg)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.