T20 World Cup, Ind vs Afg : टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये भारताची रणनीती काय असेल? कुलदीपला संधी मिळेल का?

T20 World Cup, Ind vs Afg : भारताचा सुपर ८ मधील पहिला सामना २० तारखेला अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे 

132
T20 World Cup, Ind vs Afg : टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये भारताची रणनीती काय असेल? कुलदीपला संधी मिळेल का?
T20 World Cup, Ind vs Afg : टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये भारताची रणनीती काय असेल? कुलदीपला संधी मिळेल का?
  • ऋजुता लुकतुके

टी 20 विश्वचषकातील (T20 World Cup, Ind vs Afg) गटवार साखळी सामने संपले आहेत. भारताने ए गटातून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. भारताशिवाय या गटातून अमेरिकेनं सुपर  ८ मध्ये धडक दिली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वातील भारतीय संघाने अमेरिका, आयरलंड आणि पाकिस्तानला पराभूत करत सुपर ८ मध्ये प्रवेश केला.  रोहित शर्मानं (Rohit Sharma) पहिल्या तीन टी २० सामन्यांमध्ये संघात कोणताही बदल केला नव्हता. रोहितनं चार वेगवान गोलंदाज आणि दोन अष्टपैलू फिरकीपटूंना संघात स्थान दिलं होतं. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांनी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. तर, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) यांनी फिरकी गोलंदाजीची बाजू सांभाळली. (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- Ayodhya Raam Mandir परिसरात पहारा देणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर)

आता भारतीय संघ सुपर ८ मध्ये पोहोचल्यानं आणि वेस्ट इंडिजमधील मैदानांच्या स्थितीचा आढावा घेतल्यास रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियात बदल करु शकतो. भारतानं १५ सदस्यांच्या संघात चार फिरकूपटूंना संधी दिलेली आहे. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना साखळीत संघात स्थान मिळालं नव्हतं. या दोघांशिवाय रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) हे देखील फिरकी गोलंदाजी करतात. फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्या दोघांना संघात स्थान देण्यात आलं होतं. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चांगली फलंदाजी करु शकला नाही. मात्र, अक्षर पटेलनं चांगली कामगिरी केलेली आहे. (T20 World Cup, Ind vs Afg)

आता वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यांचा अंदाज घेत भारतीय संघात फेरबदल होण्याची शक्यता आहे. कुलदीप यादवला रोहित शर्मानं (Rohit Sharma) संघात संधी दिल्यास कोणत्या खेळाडूला बाहेर बसावं लागणार याबाबत चर्चा सुरु आहेत. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संघाबाहेर बसावं लागण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- Nana Patole यांनी स्वतःचे पाय धुवून घेण्याच्या विरोधात भाजपा आक्रमक; भाजपा राज्यभर आंदोलन करणार)

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्टीफन फ्लेमिंग यांनी भारतीय संघाबद्दल भाष्य केलं, ते म्हणाले, आतापर्यंत ती गोष्ट घडली नाही, आता मात्र युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना संधी देण्यासारखी स्थिती आहे. तुम्ही एक प्रकारचं क्रिकेट खेळण्याची सवय करुन घेऊ शकत नाही. तुम्हाला परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी संघात बदल करावे लागतील. भारताला सुपर ८ मध्ये आक्रमक क्रिकेट घेळण्यासाठी कुलदीप यादवला संघात स्थान द्यावं लागेल. टी२० विश्वचषकाच्या शेवटच्या टप्प्यात खेळपट्टीवर चेंडू वळत असेल तर कुलदीप यादवला संधी द्यावी, असं स्टीफन फ्लेमिंग म्हणाले. (T20 World Cup, Ind vs Afg)

स्टीफन फ्लेमिंग यांनी न्ययॉर्कमध्ये अक्षर पटेलसाठी (Akshar Patel) चांगली स्थिती होती. तर, रवींद्र जडेजासाठी (Ravindra Jadeja) कॅरेबियन बेटांवरील स्थिती फायदेशीर असेल, असं त्यांनी म्हटलं.  (T20 World Cup, Ind vs Afg)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.