- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकात सुपर ८ च्या पहिल्या गटात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (T20 World Cup, Ind vs Aus) आमने सामने येणार आहेत. हा गटातील शेवटचा साखळी सामना असेल. उपान्त्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. कारण, गटात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान (Afghanistan) समसमान दोन गुणांवर आहेत. अशावेळी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध मोठा विजय मिळवला तर सरस धावगतीच्या आधारे त्यांची बाद फेरीतील दावेदारी आणखी प्रबळ होईल. शिवाय अफगाणिस्तानचा शेवटचा सामना बांगलादेशशी (Bangladesh) व्हायचा आहे. तो जिंकण्याची संधीही त्यांना आहे. त्यामुळे सोमवारी सेंट ल्युसियामध्ये पाऊस पडला तर भारताला काहीच अडचण होणार नाही. पण, ऑस्ट्रेलियाचं गणित बिघडू शकतं. (T20 World Cup, Ind vs Aus)
(हेही वाचा- ९०० सरकारी धान्य गोदामांची वर्षातून एकदा होणार तपासणी, State Govtच्या निर्णयाचे कारण काय ? वाचा सविस्तर)
पहिल्या गटातील गणित नेमकं काय आहे ते समजून घेऊया,
पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामना सोमवारी आणि बांदलादेश (Bangladesh) विरुद्ध अफगाणिस्तान (Afghanistan) सामना मंगळवारी भारतीय वेळेनुसार पहाटे होणार आहे. पहिला सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठला सुरू होणार आहे. सेंट ल्युसियामध्ये ही वेळ असेल सकाळी साडेदहा. तिथला हवामानाचा अंदाज पाहिला तर तो असं सांगतो की, ‘सकाळी थोडंफार सूर्यदर्शन होईल. पण, हळू हळू ८५ टक्के आकाश अभ्राच्छादित होईल. वाऱ्याचा जोरही खूप जास्त असेल. दिवस सरेल तसं आकाश स्वच्छ होत जाईल.’ (T20 World Cup, Ind vs Aus)
Back-to-back wins for the Men in Blue in the Super 8s! 💪 @hardikpandya7, your performance with the bat in the first innings was exceptional, and @imkuldeep18 – your spell was simply mind-blowing! 🔥 Let’s keep this momentum going, boys! 🇮🇳#T20WorldCup pic.twitter.com/54atxNODRn
— Jay Shah (@JayShah) June 22, 2024
या गटांत भारतीय संघ ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाकडे २ गुण (०.२२३ धावगती), अफगाणिस्तानकडे २ गुण (-०.६५० धावगती) आणि बांगलादेशचे शून्य गुण आहेत. (T20 World Cup, Ind vs Aus)
(हेही वाचा- Smriti Mandhana : मालिकेत ३४३ धावा करत स्मृती मंधानाचा अनोखा विक्रम )
अशा परिस्थितीत भारत, ऑस्ट्रेलिया सामना वाहून गेला तर दोन्ही संघांना एक गुण मिळेल. ऑस्ट्रेलियाचे ३ गुण होतील. आणि बांगलादेश (Bangladesh) विरुदध अफगाणिस्तान (Afghanistan) सामना जर अफगाणिस्तानने जिंकला तर त्यांचे ४ गुण होऊन ते बाद फेरीत जातील. जर दोन्ही सामन्यात निकाल लागू शकला नाही तर ऑस्ट्रेलिया सरस धावगतीच्या आधारे बाद फेरीत जातील. पण, अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेशने विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियन संघाला एक जरी गुण मिळाला तरी ते पुढे जाऊ शकतील. (T20 World Cup, Ind vs Aus)
ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आणि बांगलादेशने (Bangladesh) अफगाणिस्तानचा (Afghanistan) पराभव केला तर धावगती पाहिली जाईल. यात सरस धावगती असलेला संघ बाद फेरीत जाईल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाची धावगती सध्या तीन संघांत सरस आहे. अफगाणिस्तान बांगलादेश विरुद्ध जिंकलं तरी त्यांना मोठा विजय मिळवावा लागेल. (T20 World Cup, Ind vs Aus)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community