- ऋजुता लुकतुके
सुपर ८ मध्ये भारतीय संघाने आपला पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध जिंकला. या सामन्यानंतर सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांच्यातील बातचित बीसीसीआयने एका व्हिडिओतून समोर आणली आहे. भारतीय संघाची पहिली फलंदाजी होती. दहाव्या षटकानंतर सूर्यकुमार आणि विराट यांच्यात खेळपट्टीच्या मध्यावर झालेली बातचित नेमकी कशा संदर्भात होती, यावर दोघांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. (T20 World Cup, Ind vs Ban)
व्हिडिओत अक्षर सूर्यकुमारला विचारतो, ‘१० व्या षटकानंतर तू आणि विराटभाई यांच्यात काहीतरी बोलणं झालं. ते नेमकं काय होतं?’ (T20 World Cup, Ind vs Ban)
(हेही वाचा – Shaikh Hasina: शेख हसीनांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा!)
सूर्यकुमार यावर म्हणतो, ‘त्या खेळपट्टीवर १६० धावसंख्याही पुरेशी वाटत होती. मी विराट भाईला म्हटलं की, या ब्रेकनंतर मी एक-दोन चौकार ठोकू शकलो तर भारतीय डावाला चांगला आकार मिळेल. नवीन येणाऱ्या फलंदाजांनाही आधार मिळेल.’ (T20 World Cup, Ind vs Ban)
अक्षर हसत हसत सूर्यकुमारला चिडवतो. ‘याचा अर्थ तू विराट भाईला खोटं बोललास.’ सूर्यकुमारनेही हसत हसत नाही म्हणतो. ‘मी आहे तसा वागत होतो,’ असं सूर्यकुमार म्हणताना दिसतो. (T20 World Cup, Ind vs Ban)
Banter, insights and more 😎
Post-win conversations with Player of the Match Suryakumar Yadav and all-rounder Axar Patel 🥳 – By @RajalArora
WATCH 🎥 🔽 #TeamIndia | #T20WorldCup | #AFGvIND | @surya_14kumar | @akshar2026
— BCCI (@BCCI) June 21, 2024
भारतीय संघाने साखळी नंतर सुपर ८ मध्येही आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध सूर्यकुमारने सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. जसप्रीत बुमराने ७ धावांत ३ बळी मिळवत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर बांगलादेश विरुद्धही भारतीय संघाने विजय मिळवला आहे. आता बाद फेरीत भारतीय संघाचा समावेश जवळ जवळ निश्चित आहे. (T20 World Cup, Ind vs Ban)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community