- ऋजुता लुकतुके
सुपर ८ मध्ये भारतीय संघ दोन फिरकीपटूंना खेळवणार असेल तर महम्मद सिराजला बसवून त्याजागी अर्शदीपला संधी द्यावी असं मत माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनं (Anil Kumble) व्यक्त केलं आहे. अर्शदीपने (Arshdeep) आतापर्यंत या स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळेच अनिल कुंबळेला (Anil Kumble) असं वाटतंय हे उघड आहे. अमेरिकेविरुद्ध तर अर्शदीपने ९ धावांत ४ बळी मिळवले. शिवाय पाकिस्तान विरुद्ध निर्णायक क्षणी त्याने अचूक गोलंदाजी करून दाखवली होती. (T20 World Cup, Ind vs Canada)
(हेही वाचा- आधी प्रभु रामचंद्रांची भक्ती, नंतर अहंकार आला; RSS नेते Indresh Kumar म्हणाले…)
‘भारतीय संघाने दोन तेज गोलंदाज आणि सोबत हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) खेळवून अतिरिक्त फिरकीपटू खेळवला तर सिराजच्या पुढे अर्शदीपची (Arshdeep) निवड व्हायला हवी. पाकिस्तान विरुद्धचं शेवटचं षटक आणि अमेरिकेविरुद्ध टप्प्यांत केलेले परिणामकारक बदल यामुळे अर्शदीपचा फॉर्म आणि गोलंदाजीवरील पकड सिद्ध होत आहे. अशावेळी त्याला डावलू नये,’ असं अनिल कुंबळेनं ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं. (T20 World Cup, Ind vs Canada)
Career-best figures earns Arshdeep Singh the @aramco POTM award 🙌#USAvIND #T20WorldCup pic.twitter.com/dBdqdkWZ0A
— T20 World Cup (@T20WorldCup) June 12, 2024
योग्य खेळाडू निवडण्याचा निर्णय स्पर्धेच्या ठिकाणी असलेल्या संघ प्रशासनाने घ्यायचा आहे, असंही कुंबळेनं आवर्जून सांगितलं. ‘तिथलं वातावरण, प्रतिस्पर्धी संघ आणि गोलंदाजाची लय हे पाहून संघ प्रशासनानेच रणनीती ठरवायची आहे. आणि दोन्ही तेज गोलंदाज आपापल्या शैलीत उजवेच आहेत,’ असं कुंबळे शेवटी म्हणाला. अर्शदीप डावखुरा तेज गोलंदाज आहे. आणि त्यामुळे गोलंदाजीत विविधता येते. (T20 World Cup, Ind vs Canada)
(हेही वाचा- “मी पराभूत झाले आहे, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, Navneet Rana नेमकं काय म्हणाल्या ?)
या टी-२० विश्वचषकात अर्शदीपने आतापर्यंत ३ सामन्यांत ७५ धावा देत ७ बळी मिळवले आहेत. त्याचा स्ट्राईकरेट १० धावांचा आहे. (T20 World Cup, Ind vs Canada)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community