- ऋजुता लुकतुके
हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup, Ind vs Eng) चांगलाच फॉर्मात आहे. यावेळी रोहितने आपल्या कामगिरीने एक वेगळा विक्रम नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma) भन्नाट लय सापडली होती, आणि आपल्या खेळीने त्याने तब्बल ३.१ कोटी प्रेक्षक तो खेळत असताना डिस्नी हॉटस्टारवर खिळवून ठेवले. (T20 World Cup, Ind vs Eng)
(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Eng : विराट कोहली उपांत्य फेरीतही स्वस्तात बाद, किंग कोहलीला झालंय काय?)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma) टी २० विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावता आलं नाही, पण त्याच्या फलंदाजीदरम्यान प्रेक्षकांचा नवा विक्रम रचला गेला. खरंतर, जेव्हा रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत होता, तेव्हा ३.१ कोटी लोक हॉटस्टारवर लाइव्ह पाहत होते. हा आकडा या विश्वचषकातील प्रेक्षकांच्या दृष्टीने आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. याआधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत फलंदाजी करत होता तेव्हा जवळपास २.८ कोटी लोक बघत होते. (T20 World Cup, Ind vs Eng)
HOTSTAR ACHIEVED THE PEAK VIEWERSHIP OF 3.1CR WHEN ROHIT SHARMA WAS BATTING.
– The highest ever for this World Cup. 🤯🏆 pic.twitter.com/YAD64GMX7g
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 26, 2024
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सुपर-८ सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या धमाकेदार फलंदाजीने धुमाकूळ घातला होता. भारतीय कर्णधाराने ४१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या होत्या. यावेळी रोहितचे शतक हुकले होते. रोहित शर्मासमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शरणगती पत्कारली होती. (T20 World Cup, Ind vs Eng)
(हेही वाचा- Indigo Airlines ने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला बेड्या, नेमकं काय झालं ? जाणून घ्या…)
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून या विश्वचषकात उपान्त्य फेरीत मजल मारली. या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघ अपराजीत आहे. ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केल्यानंतर उपांत्य लढतीत भारताने इंग्लंडचाही ६८ धावांनी पराभव केला. आणि अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत २९ जून रोजी भारतीय संघाची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे. (T20 World Cup, Ind vs Eng)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community