T20 World Cup, Ind vs Pak : पाकच्या पराभवानंतर देशातले जाणकार बाबर आझमवर भडकले 

T20 World Cup, Ind vs Pak : ‘या संघात राम उरला नाही,’ अशी प्रतिक्रिया पाकमध्ये उमटली आहे 

235
T20 World Cup, Ind vs Pak : पाकच्या पराभवानंतर देशातले जाणकार बाबर आझमवर भडकले 
T20 World Cup, Ind vs Pak : पाकच्या पराभवानंतर देशातले जाणकार बाबर आझमवर भडकले 
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध ११९ धावसंख्येचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. संघाला ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शिवाय पाक संघाचा सलग दुसरा पराभव असल्यामुळे त्यांच्यावर स्पर्धेतून बाद होण्याची टांगती तलवार आहे. संघाच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. सामन्यात सुरुवातीला पाकिस्तानची स्थिती चांगली होती. गोलंदाजांनी भारतीय संघाला ११९ धावांत गुंडाळून निम्म काम केलं होतं. १४ व्या षटकापर्यंत पाक संघही ३ बाद ७३ अशा सुस्थितीत होता. पण, तिथून बुमराने जम बसलेल्या रिझवानचा त्रिफळा उडवला आणि सामना फिरला.  (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- Anil Patil: केंद्रात मंत्रीपद नाही, आता विधानसभेसाठी अजितदादा गटाचा ८० जागांवर दावा!)

त्यामुळे सुरुवातीला खुश असलेले पाक पाठिराखे नंतर मात्र खेळाडूंवर वैतागले. तर देशातील क्रिकेट जाणकारही कर्णधार बाबर आझम आणि संघावर संतापले आहेत. कॉट बिहाईन्ड या कार्यक्रमात बोलताना मोहम्मद नझर (Mohammad Nazar) यांनी आपला राग मोकळेपणाने व्यक्त केला. ‘दोघांमधील चांगला संघ जिंकला. सामना चुरशीचा झाला तो खेळपट्टीमुळे. अन्यथा, सामन्यात त्यांनी दिलेली लढत कधी दिसलीच नाही,’ असं नझर सुरुवातीला म्हणाले.  (T20 World Cup, Ind vs Pak)

भारतासाठी जसप्री बुमराने सामने फिरवला. बाबर आझम (Babar Azam), मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि इफ्तिकार (iftikhar) या तीन धोकादायक खेळाडूंचे बळी त्याने मिळवले. (T20 World Cup, Ind vs Pak)

 ‘पाकिस्तानचा संघ अलीकडे न्यूझीलंडच्या तिसऱ्या फळीच्या संघाबरोबर खेळला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडबरोबर खेळला. तीनही मालिकांमधील कामगिरी पाहता, भारताविरुद्धचा पराभव हा सलणारा नाही. आधीच्या कामगिरीत त्यांनी सातत्य राखलंय,’ अशी टीका मोहम्मद नझर यांनी केली.  (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Pak : विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची न्यूयॉर्कमध्ये खास भेट )

दोन सलामीवीर सोडले तर इतर संघात दम नाही, अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. सध्या पाकिस्तानच्या चाहत्यांमध्येही संघाविषयी संमिश्र भावना आहेत. पाकिस्तानचे आता साखळीतील दोन सामने बाकी आहेत. हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकून त्यांना अमेरिकन संघ भारत आणि आयर्लंड विरुद्ध जिंकणार नाही, अशी आशा बाळगावी लागेल. अमेरिकन संघ उर्वरित एक जरी सामना जिंकला तरी पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात येईल.  (T20 World Cup, Ind vs Pak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.