T20 World Cup, Ind vs Pak : बुमराची जादूई ४ षटकं, भारताची पाकिस्तानवर पुन्हा मात 

T20 World Cup, Ind vs Pak : ११९ धावांत सर्वबाद झालेल्या भारताने पाकिस्तानला ६ धावांनी हरवलं 

216
T20 World Cup, Ind vs Pak : बुमराची जादूई ४ षटकं, भारताची पाकिस्तानवर पुन्हा मात 
T20 World Cup, Ind vs Pak : बुमराची जादूई ४ षटकं, भारताची पाकिस्तानवर पुन्हा मात 
  • ऋजुता लुकतुके

एरवी ही टी-२० विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup, Ind vs Pak) प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरतेय. पण, रविवारचा दिवस याला अपवाद होता. कारण, सामना भारत विरुद्ध पाकिस्तान होता. न्यूयॉर्कमध्ये पावसालाही सामन्याासठी यावंसं वाटलं. आणि त्यामुळे सामना दीड तास उशिरा सुरू झाला. त्यानंतर मैदानावर जो खेळ रंगला ती स्विंग गोलंदाजीची जुगलबंदी होती. आधी मोहम्मद आमिर (Mohammad Amir), शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि हॅरिस रौफने (Harris Rauff) भारतीय फलंदाजांना ११९ धावांत सर्वबाद केलं.  (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: युती-आघाडीत कुरघोडीचे राजकारण)

खेळपट्टीवर स्थिरावण्याचा भारतीय फलंदाजांनी प्रयत्नच केला नाही. त्यामुळे ३ बाद ८९ वरून भारतीय संघाची घसरगुंडी उडाली. आणि १९ षटकंच संघ खेळू शकला. विराट (Virat) (५), रोहित (Rohit) (१३), सूर्यकुमार(Suryakumar) (७), शिवम (Shivam) (३) आणि हार्दिक (Hardik) (७) ही भारताची मधली फळी फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाली. रिषभ पंतने (Rishabh Pant) ४२ आणि अक्षर पटेलने (Akshar Patel) २० धावा केल्यामुळे भारतीय संघ निदान शंभरी पूर्ण करू शकला. फलंदाजीत भारताला किमान २० धावा कमी पडल्या असं वाटत असतानाच खेळपट्टीने दुसऱ्या डावातही आपले रंग दाखवून दिले. (T20 World Cup, Ind vs Pak)

पाऊस जाऊन ऊन आलं होतं. त्यात चेंडूला चांगली उसळी मिळायला लागली. पाकिस्तानचे दोन आक्रमक फलंदाज त्यामुळे बाऊन्सवर बाद झाले. एरवी त्यांची सुरुवात चांगली झाली होती. मोहम्मद रिजवानने (Mohammad Rizwan) ३१ आणि पहिल्या पाच पाक फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. पण, त्याचवेळी बुमराने आपली जादू दाखवली. मोक्याच्या जागी बळी मिळवत पाकिस्तानच्या धावांना चांगलीच खिळ घातली.  (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- Monsoon Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग, पुढचे ५ दिवस पावसाचे)

रोहितने बुमराला तिसरं षटक दिलं. बुमराने सिद्ध केलं की, तो पहिल्या षटकाचा शिलेदार आहे. पहिल्याच षटकात त्याने बाबर आझमला १३ धावांवर बाद केलं. सुर्यकुमारने स्लिपमध्ये हा झेल अप्रतिम टिपला. त्यानंतर उस्मान खानला अक्षर पटेलने १३ धावांवर पायचीत पकडलं. तर आक्रमक सुरुवात करणाऱ्या फखर झमानला १३ धावांवर हार्दिकने आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद केलं. आता पाकिस्तानची अवस्था ३ बाद ७४ होती. आणि रिझवान, इमाद भागिदारी जमवण्याच्या तयारीत दिसत होते. इतक्यात, आपल्या नवीन स्पेलमध्ये पहिल्याच षटकात बुमराने जम बसलेल्या रिझवानचा त्रिफळा उडवला. इथे भारतीय संघ पहिल्यांदा विजयाची आशा निर्माण झाली.  (T20 World Cup, Ind vs Pak)

त्यानंतर पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांना धावगती राखणंही कठीण गेलं. बुमराने फक्त १४ धावांत ३ बळी मिळवले. तर हार्दिकने २ तर अक्षर (Akshar Patel) आणि अर्शदीपने (Arshdeep) प्रत्येकी १ बळी मिळवला. जसप्रीत बुमरालाच (Jasprit Bumrah) सामनावीराचा पुरस्कार मिळाला. पाकिस्तानचा संघ २० षटकांत ७ बाद ११३ इतकीच मजल मारू शकला. बुमराने गोलंदाजीचं श्रेय शिस्तीला दिलं. ‘मी चेंडूची फेक शिवणीवर असेल असं बघितलं. त्याचा फायदा मिळत होता. सूर्य डोक्यावर आल्यावर खेळपट्टी उलट गोलंदाजांना साथ देऊ लागली. त्याचा उपयोग करून घेतला,’ असं बुमरा सामन्यानंतर म्हणाला. (T20 World Cup, Ind vs Pak)

भारतीय संघ आता ए गटात २ सलग विजयांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. (T20 World Cup, Ind vs Pak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.