- ऋजुता लुकतुके
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup) सगळ्यात लक्षवेधी लढत ९ जून रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी स्टेडिमयवर आमने सामने येतील. एकदिवसीय विश्वचषकानंतर वर्षभराच्या आत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया (Team India) आणि बाबर आझम याच्या नेतृत्त्वातील पाकिस्तान आमने सामने येत आहेत. भारतानं आयरलँड विरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवून दमदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानला नवख्या अमेरिकेनं पराभूत केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. त्यामुळं भारत पाकिस्तान मॅच मोबाईलवर मोफत कशी पाहायची हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. (T20 World Cup Ind vs Pak)
टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ जून रोजी मॅच होणार आहे. ही मॅच हॉटस्टारची वेबसाईट, अॅप आणि स्टार स्पोर्टर्सवर पाहू शकतात. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. दूरदर्शनवर देखील भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील मॅच पाहता येईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच तुम्हाला मोफत पाहायची असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये डिस्ने हॉटस्टार हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. इथं तुम्हाला मोफत मॅच पाहता येईल. डिस्ने हॉटस्टारच्या वेबसाईटला भेट देऊन देखील तुम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच पाहू शकता. मात्र, वेबसाईटवर मॅच पाहण्यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे. (T20 World Cup Ind vs Pak)
(हेही वाचा – Bhandara : पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; तरुणीकडे केली शरीरसुखाची मागणी)
या चॅनेल्सवर पाहता येणार मॅच
टीव्हीवर तुम्ही भारत आणि पाकिस्तान मॅच स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहू शकता. या चॅनेल्सवर तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये मॅच पाहू शकता. स्टार स्पोर्ट्स १ (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स २ (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २ (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स १ तामिळ (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स १, तेलुगु (एचडी+एसडी), मां गोल्ड, स्टार स्पोर्ट्स १ कन्नड, सुवर्णा प्लस एसडी, डीडी स्पोर्ट्स वर देखील मॅच पाहता याईल. (T20 World Cup Ind vs Pak)
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ टी-२० विश्वचषकात पाकिस्तान विरोधात वरचढ ठरला आहे. २०२१ च्या विश्वचषकाचा अपवाद सोडला, तर प्रत्येक सामना भारताने जिंकला आहे. (T20 World Cup Ind vs Pak)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community