T20 World Cup, Ind vs Pak : ‘माझ्या ७ धावा शेवटी निर्णायक ठरल्या,’ – मोहम्मद सिराज

T20 World Cup, Ind bt Pak : एकदिवसीय विश्वचषकापासून भारतील संघाने गोलंदाजांनाही फलंदाजीचा सराव द्यायला सुरुवात केली आहे 

178
T20 World Cup, Ind vs Pak : ‘माझ्या ७ धावा शेवटी निर्णायक ठरल्या,’ - मोहम्मद सिराज
T20 World Cup, Ind vs Pak : ‘माझ्या ७ धावा शेवटी निर्णायक ठरल्या,’ - मोहम्मद सिराज
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ धावांनी निसटता विजय मिळवला. भारतीय संघाने पहिली फलंदाजी करताना ११९ धावा केल्या. यातील सात धावा अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) होत्या. त्यामुळे सिराज सध्या खुश आहे. ‘आपल्या सात धावा शेवटी विजयात निर्णायक ठरल्या. दोन संघांमधील धावांतला तोच फरक ठरला,’ असं तो गंमतीने विजयाच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगत होता. (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- Most Runs in International Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आहेत हे तीन भारतीय चेहरे )

सिराज आपल्या टी-२० कारकीर्दीत फक्त तिसऱ्यांदा फलंदाजीसाठी उतरला. ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. तो म्हणतो त्याप्रमाणे आधीच कमी धावसंख्येच्या या सामन्यात सिराजची खेळी मोलाची ठरली. याचं श्रेय सिराजने नेट्समध्ये केलेल्या फलंदाजीच्या सरावाला दिलं आहे. (T20 World Cup, Ind vs Pak)

‘मी फलंदाजीसाठी मेहनत घेतली आहे. अगदी आयपीएलमध्येही मी फलंदाजीचा सराव केला आहे. अलीकडच्या काळात तळापर्यंत फलंदाजी झिरपलेली असणं महत्त्वाचं झालं आहे. म्हणूनच मी फलंदाजीचा सराव सुरू केला,’ असं सिराज बीसीसीआयने शेअर केलेल्या एका व्हीडिओत म्हणतो. तर यजुवेंद्र चहलने पाक वरील विजयाचं श्रेय रिषभ पंतच्या ४२ धावांच्या खेळीला दिलं. यष्टीमागेही पंत सरस ठरला. (T20 World Cup, Ind vs Pak)

 सिराजने भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचंही कौतुक केलं. फलंदाजीच्या बाबतीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मागच्या वर्षभरात तळाच्या फलंदाजांकडून सराव करून घेतला आहे. भारतीय संघात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोडले तर फारसे अष्टपैलू खेळाडू नाहीत. अकरा जणांचा संघ ठरवताना त्याची उणीव संघाला नक्कीच जाणवत होती. अगदी या टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीलाही द्रविड यांनी मनातील ही सल बोलून दाखवली होती. ‘संघात पहिल्या ५ फलंदाजांपर्यंत एकही अष्टपैलू नाही. ती संघातील मोठी उणीव आहे,’ असं द्रविड यांनी तेव्हा म्हटलं होतं. (T20 World Cup,Ind vs Pak)

(हेही वाचा- Parliament Session : लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली)

त्यावरचा उपाय म्हणूनच भारतीय संघ प्रशासनाने मागच्या वर्षभरात एक तोडगा काढला. जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आपल्या फलंदाजीचा जलवा गरज पडली तेव्हा दाखवून दिला होता. तर आता सिराजनेही नेट्समधील सरावाचा उल्लेख केला आहे. (T20 World Cup, Ind vs Pak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.