T20 World Cup, Ind vs Pak : पाक चाहता जो ट्रॅक्टर विकून सामन्यासाठी आला होता…

T20 World Cup, Ind vs Pak : भारत - पाक सामना हाऊसफुल्ल गर्दीत न्यूयॉर्कमध्ये पार पडला 

261
T20 World Cup, Ind vs Pak : पाक चाहता जो ट्रॅक्टर विकून सामन्यासाठी आला होता…
T20 World Cup, Ind vs Pak : पाक चाहता जो ट्रॅक्टर विकून सामन्यासाठी आला होता…
  • ऋजुता लुकतुके

एरवी या विश्वचषक (T20 World Cup, Ind vs Pak) स्पर्धेकडे चाहत्यांनी पाठ फिरवली आहे. पण, पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान मधला सामना याला अपवाद होता. न्यूयॉर्कच्या नसॉ काऊंटी स्टेडिअमवर (New York’s Nassau County Stadium) हा सामना पाहायला ३९,००० लोक हजर होते. यात भारतीय समर्थकांची संख्या अधिक होती. पण, दोन्ही बाजूचा आवाज समसमान होता. पाक डाव सुरू असताना १४ व्या षटकापर्यंत पाकिस्तानच्या विजयाची शक्यता ८० टक्के होती. म्हणजे प्रेक्षकांना तसं वाटत होतं. पण, त्यानंतर जसप्रीत बुमराने (Jasprit Bumrah) जम बसलेल्या रिझवानचा ३३ धावांवर त्रिफळा उडवला. सामना तिथून फिरायला सुरुवात झाली. आवश्यक धावगती वाढत गेली. ते आव्हान पाकिस्तानच्या तळाच्या फळीला जमलं नाही. निर्धारित २० षटकांत पाक संघ ७ बाद ११३ धावा करू शकला. आणि संघाचा ६ धावांनी निसटता पराभव झाला. स्टेडिअमवर आलेल्या पाक चाहत्यांचा त्यामुळे हिरमोड झाला.  (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- 3 खासदार असलेल्या 14 मित्रपक्षांना 11 मंत्रीपदे; Modi 3.0 चे जम्बो मंत्रीमंडळ)

एका पाक चाहत्याने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आपलं मन मोकळं केलं. ३००० डॉलर रुपयांचं तिकीट खरेदी करून तो हा सामना पाहायला आला होता. ‘मी सामन्याचं तिकीट खरेदी करण्यासाठी ट्रॅक्टर विकला. भारताचा डाव संपल्यावर आम्ही हरू असं आम्हाला वाटलंच नव्हतं. बाबर आझम लवकर बाद झाल्यावर थोडीशी कुणकुण लागली. शेवटी तेच खरं ठरलं. आम्ही जिंकण्याच्या अवस्थेत असताना, सामना गमावला. पण, भारतीय चाहत्यांचं या विजयासाठी मी अभिनंदन करतो.’  (T20 World Cup, Ind vs Pak)

भारतीय डावात पंतने केलेल्या ४२ धावा आणि त्यानंतर जसप्रीत बुमराने (Jasprit Bumrah) अचूक गोलंदाजी करून १४ धावांत घेतलेले ३ बळी यामुळे भारताला हा सामना जिंकणं शक्य झालं. बुमराने बाबर आझम (Babar Azam), रिझवान आणि इफ्तिकार अहमद हे महत्त्वाचे बळी टिपले. त्यामुळेच भारताचं सामन्यावर वर्चस्व निर्माण होऊ शकलं. शिवाय त्याच्या अचूक गोलंदाजीमुळे पाकिस्तानची धावगती कमी झाली. त्यांच्यावरील दडपण वाढलं. भारतातही पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध मिळवलेला हा विजय साजरा होत आहे. (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- Pune Rain Update: पुण्यात रेकॅार्डब्रेक पाऊस, ३४ वर्षाचा रेकॉर्ड मोडला)

सामना संपला तेव्हा भारतात मध्यरात्र असतानाही हा विजय अनेक ठिकाणी फटाके वाजवून साजरा करण्यात आला. (T20 World Cup, Ind vs Pak)

भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात आता पाकिस्तान विरुद्ध ७ पैकी ६ सामन्यांत विजय मिळवले आहेत. तर या विजयामुळे भारताने ए गटात जोरदार आघाडी घेतली आहे. भारताचा पुढील सामना अमेरिकेबरोबर होणार आहे. (T20 World Cup, Ind vs Pak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.