T20 World Cup, Ind vs Pak : या विश्वचषकात रिषभ पंतच तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज 

T20 World Cup, Ind vs Pak : भारतीय संघाच्या फलंदाजीच्या प्रशिक्षकांनी फलंदाजांचा क्रम ठरवून दिला आहे 

114
T20 World Cup, Ind vs Pak : या विश्वचषकात रिषभ पंतच तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज 
T20 World Cup, Ind vs Pak : या विश्वचषकात रिषभ पंतच तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज 
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघाचे फलंदाजीचे (T20 World Cup, Ind vs Pak) प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी या विश्वचषकात रिषभ पंतच (Rishabh Pant) भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, असं स्पष्ट केलं आहे. पहिल्या आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात पंतला फलंदाजीची चांगली लय सापडलेली दिसली. आणि दुखापतीमुळे दीड वर्षाच्या वर खेळापासून दूर असतानाही त्याच्या खेळण्यात संदिग्धता नव्हती. त्यामुळे पहिल्या सामन्यानंतर आता भारताची रणनीती स्पष्ट झाली आहे.  (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- T20 World Cup, US vs Pak : नवख्या अमेरिकन संघाचा पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये दे धक्का )

फक्त रिषभ पंतच (Rishabh Pant) नाही तर एकदिवसीय विश्वचषकातील दुखापतीनंतर हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) पूर्ण तंदुरुस्त दिसत असल्यावर राठोड यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हार्दिकनेही आयर्लंड विरुद्ध ३ बळी मिळवले. राठोड यांच्या बोलण्यातून दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. यशस्वीला संघात स्थान मिळवण्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) हा भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून पहिला पर्याय असणार नाही. या दोघांना निव्वळ फलंदाज म्हणून आणि ते ही बदललेल्या क्रमांकावर फलंदाजीची तयारी ठेवावी लागेल, संधी मिळाली तर.  (T20 World Cup, Ind vs Pak)

भारतीय संघ हार्दिककडे (Hardik Pandya) अष्टपैलू फलंदाज आणि तेज गोलंदाज म्हणून बघतो. न्यूयॉर्कच्या अनियमित उसळी असलेल्या खेळपट्टीवर तेज गोलंदाज यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे संघात २ फिरकीपटू आणि हार्दिक (Hardik Pandya) पकडून ४ तेज गोलंदाज असतील, हे ही आता स्पष्ट झालं आहे. निदान गटवार साखळीत तरी भारतीय संघाची रणनीती ठरलेली असेल.  (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- Ajit Pawar: आम्हीच कुठेतरी कमी पडलो, बारामतीच्या निकालाचे आश्चर्य व्यक्त करत अजित पवार म्हणाले…)

आयर्लंड विरुद्ध पंतने नाबाद ३६ धावांची खेळी रचली. सामना संपवताना त्याने मारलेला रिव्हर्स स्कूपचा षटकार तर लक्षवेधी होता. त्यामुळे राठोड खुश आहेत. ‘सराव सामना आणि नंतर पहिल्या सामन्यात पंतने सुरेखच फलंदाजी केली. सगळं छान जुळून आलं. सध्या तरी तोच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तो डावखुरा आहे ही आमच्या दृष्टीने आणखी जमेची बाजू आहे,’ असं राठोड म्हणाले.  (T20 World Cup, Ind vs Pak)

त्याचबरोबर हार्दिक पांड्याचंही त्यांनी कौतुक केलं. ‘सरावाच्या वेळी आणि सराव सामन्यातही हार्दिकने गोलंदाजीची चुणूक दाखवली होती. आणि तो तंदुरुस्त झालाय, पूर्ण क्षमतेनं खेळतोय, ही भारतीय संघासाठी सगळ्यात जमेची बाजू आहे. मधल्या फळीत जितके अष्टपैलू खेळाडू असतील, तितकं चांगलं आहे,’ असं राठोड पांड्याविषयी बोलताना म्हणाले.  (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- NDA Meeting: एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू; काय म्हणाले खासदार?)

अनियनित उसळी आणि स्विंग असलेल्या खेळपट्टीवर खेळणं हे मोठं आव्हान असल्याचंही त्यांनी मान्य केलं. (T20 World Cup, Ind vs Pak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.