- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकात रविवारी न्यूयॉर्कच्या नसॉ स्टेडिअमवर भारत विरुद्ध पाकिस्तान हा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधला सामना रंगणार आहे. दोन्ही संघ त्यासाठी सराव करत आहेत. सरावादरम्यान खेळपट्टीच्या अनियमित उसळीचा फटका भारतीय कर्णधार रोहित शर्माला पुन्हा एकदा बसला आहे. नेट्समध्ये फलंदाजी करताना रोहितच्या डाव्या हाताचा अंगठा दुखावला आहे. पण, तात्पुरत्या उपचारानंतर तो पुन्हा फलंदाजीला आला ही समाधानाची गोष्ट आहे. (T20 World Cup Ind vs Pak)
नसॉ स्टेडिअमच्या खेळपट्टीवर चेंडू अनियमित उसळी घेत आहे आणि आऊटफिल्डही धीमं आहे. त्यावरून भरपूर टीका होतेय. याच मैदानावर भारतीय संघ आपला पहिला सामना खेळला आणि यात आयर्लंड विरुद्ध त्यांनी ८ गडी राखून विजयही मिळवला. या सामन्यात रोहितने ३५ चेंडूंत ५२ धावा केल्या. पण, अचानक उसळलेला एक चेंडू खांद्याला बसल्यामुळे तो दुखापतीमुळे निवृत्त झाला होता. (T20 World Cup Ind vs Pak)
Topping The Charts – the Rohit Sharma way! 🔝
Most Wins as the #TeamIndia captain in Men’s T20Is 👏 👏#T2OWorldCup | #INDvIRE | @ImRo45 pic.twitter.com/V9SyUS0g7t
— BCCI (@BCCI) June 5, 2024
(हेही वाचा – NDA Cabinet Ministers: एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्र्याचं नाव निश्चित)
तज्ज्ञांच्या देखरेखीखाली खेळपट्टी तयार व्हाव्या यासाठी आयसीसीचा प्रयत्न
नसॉ काऊंटी खेळपट्टीवर बरीच टीका झाल्यानंतर आयसीसीनेही त्याची दखल घेतली आहे. स्पर्धेचं ठिकाण बदलणार नसल्याचं जाहीर केलं असलं, तरी खेळपट्टी सुधारण्यासाठी काय उपाय करता येतील, यावर त्यांनी खल सुरू केला आहे. खेळपट्टीवर रोलर फिरवणं, पाणी मारणं, उन्हात खेळपट्टी आच्छादित करणं असे उपाय आयसीसीकडून करण्यात येत आहेत. तर तज्ज्ञांची एक समिती नेमून त्यांच्या देखरेखीखाली स्पर्धेतील खेळपट्टी तयार व्हाव्या यासाठी आयसीसीचा प्रयत्न सुरू आहे. (T20 World Cup Ind vs Pak)
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सामना अमेरिकन प्रमाण वेळेनुसार सकाळी दहा वाजता होणार आहे. तेव्हा सूर्य डोक्यावर आलेला असतो आणि त्यामुळेही खेळपट्टीवर परिणाम जाणवत आहे. (T20 World Cup Ind vs Pak)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community