- ऋजुता लुकतुके
विराट कोहलीने यंदाच्या टी-२० विश्वचषकात फारशा धावा केल्या नसल्या तरी वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू आणि माजी कर्णधार क्रिस गेलला (Chris Gayle) विराटच्या (Virat Kohli) दर्जाबद्दल खात्री वाटते. ‘या खास प्रकारच्या खेळाडूला तुम्ही संपवू शकत नाही, तो चमकणारच,’ असं गेलने अंतिम सामन्यापूर्वी बोलून दाखवलं आहे. २०२४ च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना विराट कोहलीने ७४३ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. क्रिस गेल आणि विराट हे बंगळुरू फ्रँचाईजीमध्ये अनेक वर्षं एकत्र खेळले आहेत. (T20 World Cup, Ind vs SA)
(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs SA : अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? आयसीसीचे नियम काय सांगतात?)
अंतिम सामन्यापूर्वी विराट आपल्या फॉर्ममधून सावरेल आणि महत्त्वाच्या सामन्यात तो नक्की मजबूत कामगिरी करेल, असं गेलला वाटतं. ‘विराट (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममधून जातोय. असं अत्त्युच्च दर्जाच्या फलंदाजांच्या बाबतीतही होऊ शकतं. फॉर्म कुणाला चुकलेला नाही. पण, आधीच्या विश्वचषकात त्याने दाखवलेलं वर्चस्व आपल्याला ठाऊक आहे. तो विशेष खेळाडू आहे. अशा खेळाडूला तुम्ही कागदावर संपवू शकत नाही,’ असं गेल अंतिम सामन्यापूर्वी एएनआयशी बोलताना म्हणाला. (T20 World Cup, Ind vs SA)
The last jewel remains missing from the crown of the king 👑
Virat Kohli is one step away from #T20WorldCup glory 👀 pic.twitter.com/wmIBgrJHDU
— T20 World Cup (@T20WorldCup) June 28, 2024
कोहली (Virat Kohli) या विश्वचषकात रोहितबरोबर (Rohit) सलामीला येत आहे. कॅनडाविरुद्धचा वाहून गेलेला सामना पकडला तर ८ सामन्यांत त्याने फक्त ७५ धावा केल्या आहेत. ३७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे तो दोनदा शून्यावर बाद झाला आहे. विराट (Chris Gayle) हा चॅम्पियन खेळाडू म्हणून ओळखला जातो. महत्त्वाच्या स्पर्धेत, महत्त्वाच्या सामन्यात तो हमखास चांगली कामगिरी करतो. पण, यंदा प्रथमच तो उपान्त्य फेरीतही निष्प्रभ ठरला. इंग्लंड विरुद्ध ९ धावा करून तो बाद झाला. (T20 World Cup, Ind vs SA)
(हेही वाचा- Ladakh Tank Accident : भारतीय सैन्याच्या रणगाड्यांना नदीत मोठा अपघात, ५ जवान हुतात्मा)
त्यामुळे सगळ्यांचं लक्ष विराटच्या (Chris Gayle) फॉर्मवर आहे. कर्णधार रोहित (Rohit) आणि प्रशिक्षक राहुल (Rahul) यांनी मात्र विराटची पाठराखण केली आहे. अंतिम फेरीतही तो सलामीलाच खेळण्याची दाट शक्यता आहे. (T20 World Cup, Ind vs SA)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community