रविवारी, ३० ऑक्टोबर रोजी टी २० क्रिकेट वर्ल्ड कपमधील अत्यंत महत्वाचा सामना खेळला जात आहे. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका अशा दोन तुल्यबळ संघामध्ये हा सामना सुरु असून यात भारताची प्रथम फलंदाजी आहे. या सामन्यात भारत जिंकावा अशी भावना भारतीयांची असणे स्वाभाविक आहे, पण खुद्द पाकिस्तानचे नागरिकही अल्लाकडे भारतासाठी दुवा मागवू लागले आहेत. ज्या कोहलीची बॅट चालूच नये म्हणून अल्लाकडे साकडे घालणारे पाकिस्तानी आज मात्र कोहलीने दमदार खेळी खेळावी, रोहित शर्मा फॉर्मात यावा, असे म्हणत आहेत. यामागे पाकिस्तानचा स्वार्थ दडला आहे. जर साऊथ आफ्रिका हा सामना हरते तर पाकिस्तानची टी २० वर्ल्ड कप मधून बाहेर पडण्याची शक्यता कमी होत आहे.
काय आहे हे गणित?
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मेगा ब्लॉकबस्टर सामना पर्थवर रंगत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सामना उभय संघांसह पाकिस्तानसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज पाकिस्तानचे चाहते टीम इंडियाला चिअर करताना दिसत आहेत. ग्रुप २ मध्ये भारताने दोन सामने जिंकून ४ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. आफ्रिकेला २ सामन्यांत १ विजय व १ अनिर्णित निकालामुळे ३ गुणच मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आजची लढत महत्त्वाची आहे. झिम्बॉव्वेचा पराभव हाही पाकिस्तानच्या पथ्यावर पडले आहे, आता साऊथ आफ्रिकाचाही पराभव व्हावा, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. टीम इंडियाला विजयी मालिका कायम राखण्यासाठी आज खूप मेहनत घ्यावी लागेल हे निश्चित आहे. विराट कोहलीचा फॉर्म हा भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरतोय. पाकिस्तान, नेदरलँड्सविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनीही त्या सामन्यात अर्धशतक झळकावले. रोहितचा फॉर्म परतणे ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या सामन्यात विराटला एक मोठा विश्वविक्रम नोंदवण्याची संधी आहे.
(हेही वाचा हलाल प्रमाणपत्र देणारी संघटना दहशतवाद्यांना करतेय अर्थपुरवठा, चौकशीची मागणी)
Join Our WhatsApp Community