T20 World Cup, Ind vs SA : बार्बाडोसमध्येही दोन्ही संघांची वाट बघतोय पाऊस, करंडकासाठी आसुसलेले दोन संघ आमने सामने 

T20 World Cup, Ind vs SA : २९ आणि ३० जून या दोन्ही दिवशी पावसाची शक्यता आहे 

101
T20 World Cup, Ind vs SA : बार्बाडोसमध्येही दोन्ही संघांची वाट बघतोय पाऊस, करंडकासाठी आसुसलेले दोन संघ आमने सामने 
T20 World Cup, Ind vs SA : बार्बाडोसमध्येही दोन्ही संघांची वाट बघतोय पाऊस, करंडकासाठी आसुसलेले दोन संघ आमने सामने 
  • ऋजुता लुकतुके 

दोन्ही संघांसाठी शनिवार सकाळची हेडलाईन ठरलेली आहे, ‘ह्रदयभंग की स्वप्नपूर्ती?’ या टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup, Ind vs SA) दोन अपराजित संघ हे अंतिम सामन्यात आमने सामने ठाकले आहेत. दोन्ही संघांची पार्श्वभूमी काहीशी सारखीच आहे. १९९० मध्ये दक्षिण आफ्रिकन संघावरूल बंदी हटल्यानंतर जवळ जवळ प्रत्येक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांनी प्रवेश केला आहे. पण, त्यांची संभावना कायम ‘चोकर्स’ अशी झाली आहे. कारण, उपांत्य फेरीत ते हरतात. मोठ्या स्पर्धेत मोक्याच्या क्षणी लागणारी जिगर त्यांना अद्याप दाखवता आलेली नाही. यंदा त्यांनी उपांत्य फेरीत तर विजय मिळवला. आता अंतिम सामन्यात पुन्हा जिगर दाखवण्याची वेळ आहे. (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा- Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : सनातन धर्माच्‍या अर्थशास्‍त्रामध्‍ये मंदिरांचे स्‍थान महत्त्वाचे; अंकित शहा यांचे प्रतिपादन)

तर भारतीय संघ २०१३ पासून एका मोठ्या स्पर्धा विजयाच्या प्रतीक्षेत आहे. शेवटचा चॅम्पियन्स करंडक त्यांनी तेव्हा जिंकला होता. त्यानंतर दोनदा आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी, आयसीसीच्या टेस्ट, एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीतही अव्वल स्थान तसंच एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी, अशी मजल भारतीय संघाने मारली. पण, त्यांना आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद हुलकावणी देत आलं आहे. (T20 World Cup, Ind vs SA)

विशेष म्हणजे संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून हा शेवटचा सामना आहे. त्यांनी संघाला कायम अंतिम फेरीपर्यंत आणलं. पण, आता शेवटच्या सामन्यात अंतिम फेरीत त्यांना विजय हवा आहे. (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा- Ashoka Tree : अशोकाच्या झाडाची काळजी कशी घ्यावी ?)

९ महिन्यांपूर्वी अहमदाबादला झालेला ह्रदयभंग तर भारतीय चाहतेही विसरू शकलेले नाहीत. त्यामुळे मोक्याच्या क्षणी झालेल्या पराभवांमुळे दुखावले गेलेले दोन संघ शनिवारी आमने सामने आहेत. (T20 World Cup, Ind vs SA)

उपांत्य लढतीत भारताने इंग्लंडचा ६७ धावांनी धुव्वा उडवला. तर आफ्रिकन संघाने अफगाणिस्तानला ९ गडी आणि ६२ चेंडू राखून नेस्तनाबूत केलं. आता दोन्ही संघांचं लक्ष ब्रिजटाऊन, बार्बाडोस (Barbados) इथं किंग्जटन ओव्हल या मैदानावर असेल. पण, इथंही पाऊस दोन्ही संघांची वाट बघतोय. या सामन्याला ३० जून हा राखीव दिवस आहे. पण, दोन्ही दिवशी पावसाचा अंदाज आहे. (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा- Nagpur-Madgaon Express ला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ)

ॲक्युवेदर नुसार, शनिवारी इथं ढगाळ, दमट आणि वादळी वारे वाहतील. वादळीवाऱ्यांसह पावसाची शक्यता पहाटे आणि सकाळी वर्तवण्यात आली आहे. तर ९९ टक्के आकाश अभ्राच्छादित असेल. रविवारी राखीव दिवसासाठीचा अंदाज, ‘बहुतेक करून ढगाळ, दमट आणि वादळी वाऱ्यांची सकाळ असेल. अनियमित पावसाच्या सरी बरसतील,’ असा अंदाज आहे. (T20 World Cup, Ind vs SA)

त्यामुळे अंतिम सामन्यातही पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. बाकी कागदावर बघितलंत तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी रझा हेन्रिक्स आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) हे दोन्ही सलामीवीर फॉर्ममध्ये आहेत. भारतासाठी विराट अजून चाचपडतोय, एवढाच दोन्ही संघांतील फरक आहे. बाकी हा सामना जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) विरुद्ध हेनरिक क्लासेन (Heinrich Klaasen) असा असणार आहे. केशव महाराज विरुद्ध कुलदीप यादव (Kuldeep Yadav) असा असणार आहे. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) विरुद्ध रोहित शर्मा (Rohit Sharma) असा असणार आहे. एडन मार्करम (Aiden Markram) आणि सूर्यकुमार (Suryakumar) हे मधल्या फळीतील फलंदाजही फॉर्ममध्ये आहेत. (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा- झारखंड: NEET Pepar लीक प्रकरणी तिघांना अटक)

तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना रंगतदार होणार यात शंका नाही. (T20 World Cup, Ind vs SA)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.