T20 World Cup, Ind vs SA : अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? आयसीसीचे नियम काय सांगतात?

T20 World Cup, Ind vs SA : पाऊस पडला किंवा समसमान धावा झाल्या तर आयसीसी कुणाला, कसं विजेतेपद देणार?

162
T20 World Cup, Ind vs SA : अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? आयसीसीचे नियम काय सांगतात?
T20 World Cup, Ind vs SA : अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? आयसीसीचे नियम काय सांगतात?
  • ऋजुता लुकतुके 

टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना शनिवारी २९ जूनला भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनूसार रात्री ८ वाजता या सामन्याला सुरु होईल. मात्र याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिवशी बार्बाडोसमध्ये (Barbados) ८१ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा- Mumbai Local: रविवारी घराबाहेर पडाल तर होईल डोक्याला ताप; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, असं असेल लोकलचे वेळापत्रक)

पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे अंतिम सामन्याला उशीर झाल्यास, त्याच दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी १९० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागू केला जाईल. दोन्ही संघ प्रत्येकी किमान १० षटके खेळतील तेव्हाच सामन्याचा निकाल लागू शकेल. जर दोन्ही संघ १० – १० षटकं खेळू शकले नाहीत तर सामना राखीव दिवशी खेळवण्यात येईल. (T20 World Cup, Ind vs SA)

आता राखीव दिवशीही पाऊस पडला तर काय होईल पाहूया,

आयसीसीच्या नियमानुसार अंतिम सामना न झाल्यास किंवा टाय झाल्यास सुपर ओव्हर घेण्यात येते. राखीव दिवशीही कोणताही संघ विजेता होऊ शकला नाही आणि सुपर ओव्हर देखील शक्य नसेल तर अंतिम सामन्याचा निकाल ‘अर्निणित’ म्हणून घोषित केला जाईल. सुपर ओव्हर न झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. मात्र टी-२० विश्वचषकाच्या १७ वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही संयुक्त विजेता झालेला नाही. (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs SA : राहुल द्रविडला शेवटच्या सामन्यात संघाकडून हवं आहे विजयाची गिफ्ट)

आयसीसीचे नेमके नियम काय?

  • . रात्री ८ वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यादरम्यान पाऊस आला तरी रात्री १० वाजून ४० मिनिटांपर्यंत षटकांची संख्या कमी केली जाणार नाही. त्यानंतर मात्र षटकांची संख्या कमी केली जाईल.

  • आयसीसीच्या नियम १३.७ आणि १३.६ नुसार पावसाच्या स्थितीत अतिरिक्त १९० मिनिटांचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. 

  • भारतीय वेळेनुसार रात्री १२ वाजून १० मिनिटांनंतर १० – १० षटकांचा सामना खेळविण्याचा प्रयत्न असेल. जर काही षटकांनंतर पावसाने हजेरी लावल्यास २० – २० षटके दुसऱ्या दिवशी पूर्ण केली जातील.

  • राखीव दिवसाचा निर्धारित वेळ पावसाच्या व्यत्ययात नष्ट झाल्यास भारतीय वेळेनुसार रात्री १२.१० नंतर १९० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत १० -१० षटके पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरही पावसामुळे १० -१० षटकांचा खेळ होणार नसेल तर आयसीसीच्या नियम १६.१० नुसार ‘सुपर ओव्हर’ करण्यात येईल. सुपर ओव्हरदेखील शक्य न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल. 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.