T20 World Cup, Ind vs USA : अर्शदीप सिंगचा भारतासाठी अनोखा विक्रम

T20 World Cup, Ind vs USA : सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवणारा अर्शदीप पहिला भारतीय गोलंदाज ठरला

105
T20 World Cup, Ind vs USA : अर्शदीप सिंगचा भारतासाठी अनोखा विक्रम
T20 World Cup, Ind vs USA : अर्शदीप सिंगचा भारतासाठी अनोखा विक्रम
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध अमेरिका (T20 World Cup, Ind vs USA) सामन्याची सुरुवातच भारतासाठी एका अनोख्या विक्रमाने झाली. भारतासाठी अर्शदीपच्या (Arshdeep Singh) नावावर या विक्रमाची नोंद झाली. अर्शदीप टी-२० विश्वचषकात (T20 World Cup, Ind vs USA) सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. डावखुरा तेज गोलंदाज अर्शदीपने पहिल्या चेंडूवर अमेरिकन सलामीवीर शयन जहांगीरला पायचीत पकडलं. अर्शदीपचा (Arshdeep Singh) हा चेंडू टप्पा पडल्यावर झपकन आत वळला. जहांगीरला तो न कळल्यामुळे तो यष्टीसमोर अडखळला. हा चेंडू थेट उजव्या यष्टीला आदळणारा होता. त्यामुळे जहांगीर बाद झाला. अर्शदीपला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळाला. (T20 World Cup, Ind vs USA)

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

 भारता विरुद्ध अमेरिकन कर्णधार मोनांक पटेल (Monak Patel) खांद्याच्या दुखापतीमुळे खेळला नाही. त्याच्या जागी जहांगीर संघात आला होता. पण, तो शून्यावर बाद झाला. अर्शदीपने मग त्याच षटकात अमेरिकेचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आंद्रियास जोसलाही बाद केलं. अर्शदीपने (Arshdeep Singh) या सामन्यात ४ षटकांत ९ धावा देत ४ बळी मिळवले. अर्शदीप पूर्वी आणखी ३ फलंदाजांनी टी-२० विश्वचषकात सामन्याच्या पहिल्या चेंडूवर बळी मिळवण्याची किमया केली आहे. (T20 World Cup, Ind vs USA)

(हेही वाचा- Uddhav Thackeray: ठाकरे, राऊत यांची विशेष न्यायालयात धाव; कारण काय?)

मश्रफे मुर्तझा (बांगलादेश) वि. अफगाणिस्तान, २०१४

शापूर झदरान (अफगाणिस्तान) वि. हाँगकाँग, २०१४

रुबेन ट्रंपलमान (नामिबिया) वि. स्कॉटलंड, २०२१

रुबेन ट्रंपलमान (नामिबिया) वि. ओमान, २०२४

अर्शदीप सिंग (भारत) वि. अमेरिका, २०२४

अर्शदीप बरोबर ट्रंपलमान आणि अफगाणिस्तानचा फझलहक फारुखी यांनी पहिल्या षटकात दोन बळी घेतले आहेत. (T20 World Cup, Ind vs USA)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.