T20 World Cup, Ind vs USA : अमेरिकेला ७ गडी राखून हरवत भारताचा सुपर ८मध्ये प्रवेश 

T20 World Cup, Ind vs USA : ११४ हा नसॉ काऊंटी मैदानावरील धावांचा पाठलाग करतानाची सर्वात मोठी धावसंख्या ठरली 

113
T20 World Cup, Ind vs USA : अमेरिकेला ७ गडी राखून हरवत भारताचा सुपर ८मध्ये प्रवेश 
T20 World Cup, Ind vs USA : अमेरिकेला ७ गडी राखून हरवत भारताचा सुपर ८मध्ये प्रवेश 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात (T20 World Cup, Ind vs USA) सलग तिसरा विजय मिळवत अमेरिकन संघाचा ७ गडी राखून पराभव केला. त्याबरोबरच सुपर ८मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. पण, आपली पहिली विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या अमेरिकन संघानेही आपली तयारी दाखवून दिली. पहिली फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये २ बाद १८ अशी बिकट अवस्था असताना अमेरिकन मधल्या फळीने त्यांना या स्पर्धेत आव्हानात्मक ठरलेली ११३ ही धावसंख्या गाठून दिली. भारताचे रोहित आणि विराट हे दोन्ही सलामीवीर १५ धावांत गारद केले. त्यानंतर रिषभ पंतही १८ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि शिवम दुबे (Shivam Dubey) या मुंबईकर फलंदाजांचा जम बसला. अशावेळी काय प्रत्युत्तर द्यायचं हे नवख्या अमेरिकन संघाला कळलं नाही. त्यांचा खेळ काहीसा रुळावरून घसरलाही. अनुभवी सुर्यकुमारने चाचपडणाऱ्या शिवमला हाताशी धरून भारताला विजय मिळवून दिला. ए गटात सुपर ८ गाठणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला आहे. (T20 World Cup, Ind vs USA)

४९ चेंडूंत ५० धावा करणारा सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), ३१ धावांवर नाबाद राहिलेला शिवम दुबे (Shivam Dubey) आणि ९ धावांत ४ बळी मिळवणारा अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांच्यामुळे भारताला हा विजय शक्य झाला. तर अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने (Saurabh Netravalkar) आपला ठसा उमटवताना रोहित (Rohita) आणि विराट (Virat) हे महत्त्वाचे बळी मिळवले. (T20 World Cup, Ind vs USA)

(हेही वाचा- Varsova Unauthorised Construction : वर्सोव्यात अनधिकृत इमारतींवरील हातोडा सत्र सुरुच, सातव्या मोठ्या इमारतीवर कारवाई )

अर्शदीपने सामन्याच्या पहिल्याच षटकात दोन बळी मिळवले. अमेरिकन संघाला खिंडार पाडलं. त्यानंतर एरॉन जोन्सला हार्दिकने बाद केलं. अक्षर पटेलने (Akshar Patel) स्टिव्हन टेलरला २४ धावांवर बाद केल्यावर अमेरिकेची अवस्था ४ बाद ५६ अशी झाली. नितिष कुमारने २३ चेंडूंत २७ धावा करत अमेरिकन डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे अमेरिकेच्या जहांगीर आणि आंद्रियास जोस वगळता इतर प्रत्येक फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला. अर्शदीप खेरीज हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) १४ धावांत २ बळी मिळवले. भारतीय संघाचा पुढील सामना १५ जूनला कॅनडा विरुद्ध होणार आहे. (T20 World Cup, Ind vs USA)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.