- ऋजुता लुकतुके
क्रिकेटच्या निमित्ताने भारतीय संघ दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर आहे. यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतील दोन सामने अमेरिकेत खेळवण्यात आले होते. आणि आता टी-२० विश्वचषकच अमेरिकेत संयुक्तपणे होतोय. अशावेळी भारतीय संघ फावल्या वेळेत स्थानिक अमेरिकन लोकांबरोबर वेळ घालवण्याबरोबरच क्रिकेटचा प्रसारही करत आहे. २०२८ च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेटचा समावेश आहे. आणि त्या दृष्टीने अमेरिकन लोकांची क्रिकेटशी ओळख होणं महत्त्वाचं आहे. (T20 World Cup, Ind vs USA)
(हेही वाचा- Pema Khandu तिसऱ्यांदा घेणार अरुणाचलच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!)
त्यासाठीच अमेरिकेतील लहान मुलांबरोबर भारतीय क्रिकेटपटूंची अनौपचारिक भेट घडवून आणण्याचा एक कार्यक्रम मंगळवारी आखण्यात आला होता. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), शुभमन गिल (Shubman Gill), रिषभ पंत (Rishabh Pant), यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal), शिवम दुबे (Shivam Dubey), रिंकू सिंग (Rinku Singh), आवेश खान (Avesh Khan) असे क्रिकेटपटू या उपक्रमात सहभागी झाले होते. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलीपही इथं होते. (T20 World Cup, Ind vs USA)
#NewYork | The Indian cricket team enjoyed a fun-filled day out with kids ahead of their match against the #USA! 🏏🇮🇳
The players took some time to relax, bond, and spread joy before diving back into T20 World Cup action.@tapasjournalist @RishabhPant17 @imkuldeep18… pic.twitter.com/9XVO0hoY0p
— DD News (@DDNewslive) June 12, 2024
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूयॉर्कमधील अमेरिकन कॉन्स्युलेट जनरल कार्यालयानेही भारतीय संघासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांची क्रिकेटपटूंबरोबर भेट घडवून आणण्याचा हा कार्यक्रम होता. त्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binney), बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukl) आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) उपस्थित होते. रोहीत शर्माचा (Rohit Sharma) संघ आतापर्यंत या स्पर्धेत अपराजीत आहे. आयर्लंड विरुद्ध भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ६ धावांनी हरवलं. त्यानंतर यजमान अमेरिकेला हरवून भारतीय संघाने सुपर ८ फेरी गाठली आहे. (T20 World Cup, Ind vs USA)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community