T20 World Cup, Ind vs USA : अमेरिकेचा भारताविरुद्ध नकोसा वाटणारा विक्रम 

T20 World Cup, Ind vs USA : भारताविरुद्ध अमेरिकन संघाची सुरुवात एकदम खराब झाली

171
T20 World Cup, Ind vs USA : अमेरिकेचा भारताविरुद्ध नकोसा वाटणारा विक्रम 
T20 World Cup, Ind vs USA : अमेरिकेचा भारताविरुद्ध नकोसा वाटणारा विक्रम 
  • ऋजुता लुकतुके

आतापर्यंत अमेरिकन संघाने या विश्वचषक स्पर्धेत चांगल्या कामगिरीने आपला ठसा उमटवला आहे. पाकिस्तानला (Pakistan) त्यांनी सुपर ओव्हरमध्ये धूळ चारली. पण, भारताविरुद्ध मात्र पहिली फलंदाजी करताना अमेरिकन संघाच्या नावावर एक नकोसा विक्रम लागला. पॉवर प्लेमध्ये टी-२० विश्वचषकात (T20 World Cup, Ind vs USA) सगळ्यात कमी धावा करण्याचा हा विक्रम आहे. आणि भारताविरुद्ध तर ही नीच्चांकी धावसंख्या आहे. अर्शदीपच्या पहिल्या षटकांत अमेरिकेनं दोन बळी गमावले. आणि यातून सावरायला अमेरिकन संघाला वेळ लागला. पॉवरप्लेच्या ६ षटकांत त्यांनी २ बाद १८ धावा केल्या. अमेरिकेसाठीही पॉवरप्लेमधील ही नीच्चांकी धावसंख्या आहे.  (T20 World Cup, Ind vs USA)

(हेही वाचा- Malad Crime : आइस्क्रीम कोन मध्ये मानवी बोटाचा तुकडा, मालाड मध्ये खळबळ)

अर्शदीपने पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवर शयन जहांगीरला पायचीत पकडलं. तर फॉर्ममध्ये असलेल्या आंद्रियास जोसला त्याना हार्दिककडे झेल द्यायला भाग पाडलं.  (T20 World Cup, Ind vs USA)

 भारतीय संघाने यापूर्वीही पॉवरप्लेमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचं काम केलं आहे. वेस्ट इंडिजने (West Indies) २०१४ मध्ये एकही बळी गमावला नसला तरी फक्त २४ धावा केल्या होत्या. पॉवरप्लेमध्ये फक्त दोन क्षेत्ररक्षक ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतात. त्यामुळे फलंदाजांना क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू फटकावण्याची संधी असते. असं असताना फक्त ६ धावांची धावगती ही खूपच कमी मानली जाते. (T20 World Cup, Ind vs USA)

भारताविरुद्ध पॉवरप्लेमध्ये खराब कामगिरी 

अमेरिका – २/१८, न्यूयॉर्क (२०२४)

वेस्ट इंडिज – ०/२४, मीरपूर (२०१४)

द आफ्रिका – ३/२४, पर्थ (२०२२)

आयर्लंड – २/२४, न्यूयॉर्क (२०२४)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs USA : पंचांनी अमेरिकन संघाच्या ५ धावा का कमी केल्या? )

२०२२ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) भारताने दक्षिण आफ्रिकेलाही (South Africa) पॉवरप्लेमध्ये ३ बाद २४ धावांत रोखलं होतं. दुर्दैवाने हा सामना मात्र भारताने गमावला. भारताने पहिली फलंदाजी करताना ९ बाद १३३ धावा केल्या होत्या. यात सुर्यकुमार यादवने सर्वाधिक ६८ धावा केल्या. आणि याला उत्तर देताना अर्शदीपनेच आफ्रिकन आघाडीच्या फळीला सुरुंग लावला. पण, त्यानंतर मार्करम आणि मिलर यांनी शतकी भागिदारी करून भारताचा पराभव केला. (T20 World Cup, Ind vs USA)

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.