T20 World Cup, Ind vs USA : पंचांनी अमेरिकन संघाच्या ५ धावा का कमी केल्या? 

T20 World Cup, Ind vs USA : आयसीसीच्या एका नवीन नियमामुळे गोलंदाजी सुरू असताना संघाच्या ५ धावा कमी करण्यात आल्या

131
T20 World Cup, Ind vs USA : पंचांनी अमेरिकन संघाच्या ५ धावा का कमी केल्या? 
T20 World Cup, Ind vs USA : पंचांनी अमेरिकन संघाच्या ५ धावा का कमी केल्या? 
  • ऋजुता लुकतुके

आपली पहिलीच विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup, Ind vs USA) खेळणाऱ्या अमेरिकन संघाने बलाढ्य भारताला सहजासहजी विजय मिळू दिला नाही. अगदी ११० धावांचं आव्हान पार करतानाही त्यांनी विराट, रोहितला झटपट बाद करत भारतावरील दडपण वाढवलं होतं. पण, नवख्या अमेरिकन संघाला दोन चुका भोवल्या. तेराव्या षटकात सुर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) त्या मानाने सोपा झेल सौरभ नेत्रावळकरे (Saurabh Netravalkare) सोडला. सुर्यकुमार तेव्हा २२ धावांवर खेळत होता. भारताला अजूनही ५० धावा जिंकण्यासाठी हव्या होत्या. अमेरिकेनं ही संधी घालवली. दुसरी चूक संघाचा नवोदित बदली कर्णधार एरॉन जोन्सने (Aaron Jones) केली. (T20 World Cup, Ind vs USA)

गोलंदाज वेळेत षटक सुरू करतायत की नाही हे पाहायला तो विसरला. त्यामुळे दंड म्हणून अमेरिकन संघाच्या ५ धावा पंचांनी कमी केल्या. भारतासाठी आणि एकूणच या स्पर्धेत १०० धावांचं आव्हानही कठीण जात असताना अमेरिकेनं स्वत:हून आपल्या चुकीमुळे भारतासमोरील आव्हान थोडं सोपं केलं. आयसीसीचा हा नवीन नियम आहे. आणि या विश्वचषकातच तो पहिल्यांदा लागू झाला आहे.  (T20 World Cup, Ind vs USA)

(हेही वाचा- Uddhav Thackeray: ठाकरे, राऊत यांची विशेष न्यायालयात धाव; कारण काय?)

दोन षटकांमध्ये ६० सेकंदांपेक्षा कमी वेळ राखणं आता गोलंदाजांना किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला बंधनकारक असेल. ६० सेकंदांच्या आत पुढील षटक सुरू करावंच लागेल. एका डावात तीनदा उशीर झाला तर संघाच्या पाच धावा कमी करण्यात येतात. अमेरिकेनं व्यूहरचना आखणं आणि क्षेत्ररक्षकांना तैनात करणं यात काहीवेळा नाहक वेळ घेतला. अर्थात, नवख्या संघाकडून अशा चुका होऊ शकतात. भारताचं आव्हान समोर असल्यामुळेही कर्णधाराचा गोंधळ होऊ शकतो. पण, त्याचा फटका अशा पद्धतीने अमेरिकन संघाला बसला. मोनांक पटेलच्या जागी संघाचं नेतृत्व करणारा एरॉन जोन्स (Aaron Jones) पंचांच्या  या निर्णयावर नाराज दिसला. त्याने पंचांशी थोडावेळ वादही घातला. पण, नियमच तसं सांगत असल्यामुळे त्याला ऐकावं लागलं.  (T20 World Cup, Ind vs USA)

सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. ए गटातून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. (T20 World Cup, Ind vs USA)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.