- ऋजुता लुकतुके
यंदाची टी-२० विश्वचषक (T20 World Cup, India Champion) स्पर्धा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी (Rishabh Pant) विशेष होती. दीड वर्षांपूर्वी रस्ते अपघातात जखमी झालेला रिषभ क्रिकेट पुन्हा खेळू शकेल असं कुणाला वाटलंही नव्हतं. पण, जिगरबाज रिषभने तंदुरुस्तीवर मेहनत घेतली. २ वर्षांत तो मैदानावर परतला. दीड महिन्यांची आयपीएल ही त्याची पहिली स्पर्धा. लगेचच टी-२० विश्वचषकातही त्याने स्थान मिळवलं. त्यामुळेच असेल कदाचित या विजेतेपदाची गोडी त्याच्यासाठी अवीट आणि वेगळी आहे. (T20 World Cup, India Champion)
(हेही वाचा- Ajit Pawar : “राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही” अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट!)
म्हणूनच पंतने विजेतेपदाबरोबरच मिळालेल्या पदकाचा फोटो सोशल मीडियावर टाकून त्यावर एक छोटासा संदेश लिहिला, ‘या पदकाची जागा खास आहे.’ (T20 World Cup, India Champion)
This medal 🥇 hits you differently 🇮🇳🇮🇳😇 pic.twitter.com/V9p2frmO8N
— Rishabh Pant (@RishabhPant17) July 3, 2024
पहिल्या सहा तासांतच ७ लाख लोकांनी रिषभची (Rishabh Pant) ही पोस्ट पाहिली आहे. अनेक चाहत्यांनी रिषभचं कौतुक केलं आहे. पण, त्याचवेळी अक्षर पटेल (Akshar Patel) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) या संघ सहकाऱ्यांनी पंतची थोडी टरही उडवली आहे. अक्षर पटेल (Akshar Patel) प्रतिक्रियांमध्ये लिहितो, ‘भाई, माझ्याकडे पण, असंच पदक आहे.’ त्यावर मोहम्मद सिराजने आणखी कुरघोडी केली आहे. ‘सेम असंच माझ्याकडेही आहे घरी,’ असं सिराजने लिहिलं आहे. (T20 World Cup, India Champion)
भारतीय संघ गुरुवारी भारतात परतला आहे. संध्याकाळी संघासाठी मुंबईत विशेष सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संघाने सलग ९ सामने अपराजित राहात ही स्पर्धा जिंकली. आणि ११ वर्षांचा आयसीसी पदकांचा दुष्काळ संपवला. (T20 World Cup, India Champion)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community